आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Candidate Kiran Bedi A Strong Competitor, Said Aap Leader Shanti Bhushan

भाजपकडून बेदींच्या उमेदवारीचा मास्टरस्ट्रोक, आपचे नेते शांती भूषण यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करून भाजपने मास्टरस्ट्रोक मारला असल्याची प्रतिक्रिया आपचे संस्थापक सदस्य शांती भूषण यांनी दिली आहे. याबरोबर आपमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, भूषण यांचे वक्तव्य पक्षांतर्गत लोकशाही द्योतक असल्याचा दावा आपने केला आहे. त्यांचे हे मत वैयक्तिक असल्याचे सांगण्यासही आप विसरला नाही.

बेदी मुख्यमंत्री झाल्यास अण्णा हजारे यांना आनंदच होईल. हजारेप्रणीत भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत बेदींचा प्रभावी सहभाग होता याची आठवण त्यांनी काढली. किरण बेदींनी भाजपमध्ये प्रवेश केला हा मास्टरस्ट्रोक आहे. अण्णा हजारेंच्या चळवळीत अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आणि किरण बेदी यांच्यात बेदींची भूमिका प्रभावी होती, असे भूषण यांनी सांगितले. भूषण यांच्या वक्तव्यावर बेदी यांनी केवळ आभार व्यक्त करत जास्त न बोलणे पसंत केले. भूषण यांनी वैयक्तिक मत व्यक्त केले आहे आणि त्याला पक्षाचा पाठिंबा नाही, असे आपचे दिल्ली संयोजक आशुतोष यांनी सांगितले. ते पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाहीत आणि त्यास पाठिंबाही नाही. भूषण यांनी भाजपला सर्वात भ्रष्ट ठरवले होते. आरटीआयच्या कक्षेत येण्यास या पक्षाचा विरोध आहे. असे असताना बेदींनी त्या पक्षात प्रवेश केला आहे. यातून त्यांचा राजकीय संधिसाधूपणा स्पष्ट दिसतो, असा आरोप आशुतोष यांनी केला. भूषण यांनी आप आणि केजरीवाल यांच्यावर पहिल्यांदाच निशाणा साधला नाही. त्यांनी याआधीही केजरीवाल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पुढे वाचा आपमध्ये फेररचना हवी