आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्यांची धुळवड रंगली जेटलींच्या निवासस्थानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकरचा द्रमुकने पाठिंबा काढून घेतला आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आयपीएल-६ मध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंना खेळू देण्यास विरोध दर्शवला आहे. समाजवादी पक्षही तिसरी आघाडीची मोर्चेबांधणी करत आहे. यामुळे काँग्रेसचे रंग उडालेले असताना प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने आज होलिकात्सवानिमीत्त मनसोक्त रंगांची उधळण केली आहे.

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या ९, अशोक मार्ग येथील निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेते अबीर-गुलाल उधळत रंगाच्या सणात रंगून गेले होते. यात पक्ष प्रवक्ते आणि वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद आघाडीवर होते. त्यांनी प्रत्येकाला रंग लावत धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

अरूण जेटली यांच्या निवासस्थानी होळी खेळण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, पक्ष प्रवक्त्या निर्मला सीतारमण एकत्र आले. जेटली यांनी होलिकात्सवाचे आयोजन केले असले तरी रंग खेळताना ते सावधगिरी बाळगताना दिसत होते. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी त्यांना गुलालाचा टीळा लावून त्यांच्या आनंदात भर घातली. सर्व नेत्यांमध्ये रविशंकर प्रसाद मनसोक्त रंग खेळताना दिसत होते. त्यांनी प्रत्येकाला रंग लावला.

तिथे उपस्थित असलेल्या पत्रकार आणि छायाचित्रे घेण्यासाठी पुढे येत असलेल्या छायाचित्रकारांनाही रविशंकर प्रसाद यांनी रंगवून टाकले होते.

सर्व छायाचित्र - भुपिंदर सिंह.