आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Cm Candidate Kiran Bedi Attack On Kejriwal Get

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Tough Cop किरण बेदी झाल्या भावूक, केजरीवालांवर मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अखेरच्या टप्प्यात पोहोचलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी बुधवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. कृष्णानगरमध्ये एका रोज शोमध्ये त्या भावूकही झाल्या. प्रचारादरम्यान लोकांचे एवढे प्रेम मिळत आहे की, आभार मानायला आपल्याकडे शब्द नसल्याचे किरण बेदी म्हणाल्या.
फोटो - कृष्णानगरमध्ये रोड शो दरम्यान किरण बेदी भावूक झाल्या होत्या.
केजरीवालांना चर्चेत राहायला आवडते
आतापर्यंत अरविंद केंजरीवाल यांच्या विरोधात थेट बोलणे टाळलेल्या किरण बेदींनी बुधवारी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, केजरीवाल यांना मिडियात चर्चेत राहण्याची सवय आहे. त्यासाठी ते मतदारांची दिशाभूल करत आहेत. ही त्यांची जुनील सवय आहे. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी ते काहीही करतील हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. लोकांनी भावूक होऊ नये असे बेदी म्हणाल्या. तसेच यावेळी बोलताना किरण बेदी म्हणाल्या की, केजरीवाल आतापर्यंत प्रत्येक गोष्टीपासून दूर पळत राहिलेले आहेत. लोकपाल कायदा बनण्यापूर्वीच आंदोलन गुंडाळत त्यांनी पक्ष स्थापन केला. त्यामुळेच मी त्यांची साथ सोडली. आता त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. तर त्यापासूनही ते दूर पळत आहेत.

केजरीवाल म्हणाले नजरेला नजर भिडवून बोलावे
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनीही किरण बेदींवर हल्ला सुरुच ठेवला आहे. हवालाचा आरोप लागल्यानंतर बुधवारी केजरीवाल म्हणाले की, मी काही चुकीचे केले असेल तर भाजप नेते मला अटक का करत नाहीत. सरकार त्यांचे आहे. मी किरण बेदींबरोबर तीन वर्ष काम केले आहे. मी त्यांना मोठ्या बहिणीप्रमाणे मानतो. त्यांनी समोर येऊन माझ्या नजरेला नजर भिडवून बोलावे असे ते म्हणाले. तसेच किरण बेदींनी राजकारणात काही मर्यादा पाळाव्यात असा सल्लाही त्यांनी दिला.
पुढे पाहा, रोड शोचे PHOTO