आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Condemns Terror Strikes,says Pak Continuing With Proxy War

जम्मू-काश्मिरमधील दुहेरी हल्ल्यानंतर पाकशी चर्चेवर भाजपचा आक्षेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मिरमधील हिरानगर पोलिस स्टेशन आणि सांबा येथील लष्करी छावणीवर आज (गुरुवार) झालेल्या दुहेरी दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्यास प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकी नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जाहिर केले होते. पंतप्रधानांनी चर्चेचा फेरविचार करावा असे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वि म्हणाले की, हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले तर, माझे मत आहे की पाकिस्तानसोबत चर्चा करु नये.

यापूर्वी प्रत्यक्षनियंत्रण रेषेवर पाच भारतीय जवानांची हत्या तसेच शस्त्रसंधीचे वारंवार होणारे उल्लंघन यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा करु नये असा सूर आधीपासून भाजपचा राहिला आहे. भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. नियंत्रण रेषेवरील घटना पाहाता शिखर परिषदेसाठी ही योग्य वेळ नसल्याचे पंतप्रधानांच्या दौ-यापूर्वीच त्यांनी म्हटले होते. मात्र विरोधीपक्षाने विरोध दर्शवल्यानंतरही पाकिस्ताचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चेचा अधिकृत कार्यक्रम सरकारने बुधवारी जाहीर केला आहे.


पुढील स्लाइमध्ये वाचा, पंतप्रधांन डॉ. मनमोहन सिंग यांचा अमेरिकेतील कार्यक्रम