आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP, Congress Flouted Foreign Funding Norms: Delhi HC

काँग्रेस, भाजपवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - परदेशी निधीच्या आरोपासंदर्भात काँग्रेस आणि भाजपवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला दिला आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी फॉरेन काँट्रिब्यूशन रेग्युलेशन कायद्याचे उल्लंघन केल्याचे न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्या. जयंत नाथ यांच्या पीठाने म्हटले आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)चे वकील प्रशांत भूषण यांच्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ब्रिटनची कंपनी वेदांता आणि भारतात त्यांना सहकार्य करणार्‍या स्टर्लाइट इंडस्ट्रीज, सेसा गोवा आणि बाल्को भारत या कंपन्या राजकीय पक्षांना कोट्यवधींचा निधी देत आहेत, असा दावा भूषण यांनी याचिकेतून केला आहे. कंपनी अँक्ट 1956 नुसार वेदांता ही परदेशी कंपनी असल्याच्या निष्कर्षाप्रत उच्च न्यायालय पोहोचले आहे. याचिकेत 2012 च्या वार्षिक अहवालाचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यात 2011-12 मध्ये 20.1 लाख डॉलर्सचा राजकीय फंडिंग देण्यात आल्याची नोंद आहे.