आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'या' अटीवर बॅलेटने निवडणुकीची भाजपची तयारी, दिल्ली अध्यक्ष तिवारींशी Exclusive बातचीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीतील सर्वात मोठ्या विजयानंतर दिल्लीचा विकास कुठल्या पद्धतीने होणार? केजरीवाल सरकारशी संघर्षाच्या परिस्थितीत सत्तारूढ भाजप कसा सामना करणार? आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) होत असलेल्या आरोपांवर भाजपच्या प्रदेश नेतृत्वाला नेमके काय वाटते? या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर भास्कर समूहाचे वार्ताहर शेखर घोष यांनी दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्याशी साधलेला हा संवाद 
 
}भाजपला सर्वात मोठा विजय मिळालाय. पुढची व्यूहरचना नेमकी काय असेल? 
Àपंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास रथ वाटचाल करतोय. दिल्लीचा ग्रामीण परिसर, गावखेडे, दलित वस्त्या, अवैध वस्त्यांमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उज्वल यशासाठी आतापासूनच कामाला लागलाय. त्यामुळे आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीतही भाजप लोकसभेच्या सर्व सात जागांवर अभूतपूर्व असा विजय मिळवेल, असा विश्वास आहे. 

}ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचा केजरीवाल यांचा आरोप आहे. तुमची मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी आहे? 
Àजर ईव्हीएममध्ये काही चुकीचे असेल तर केजरीवाल यांनी तात्काळ राजीनामा देऊन निवडणुकीचा सामना करावा. आम्ही केजरीवाल यांच्यासह निवडणूक आयोगाकडे जाऊन मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणूक घेण्याची विनंती करू. त्यांच्यामुळे आमची निसर्गाचा अभिशाप स्वीकारण्याची तयारी आहे. ईव्हीएम मुळे कागद आणि वेळेची किती बचत होते, हे साऱ्या जगाला ठावूक आहे. त्यांना ईव्हीएम बाबत संशय असेल तर ते स्वत: इंजिनिअर आहेत.
 
}आमआदमी पक्ष भाजपवर आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करतोय. त्यात कितपत सत्य आहे? 
Àकेजरीवाल यांचीजीभ ५६ इंचाची आहे, तेवढाच हा आरोप देखील खरा आहे. आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून पराभव करणे जाणतो. तोडफोडीचे राजकारण भाजपचे धोरण नाही. 

}दिल्लीसंपाची राजधानी बनली आहे, दिल्लीला कचराघराचे स्वरुप येते. तुम्ही सुधारणा घडविण्यासाठी नेमके काय करणार? 
त्यासाठीदिल्ली सरकार जबाबदार आहे. विकासनिधी साठी आम्ही यापूर्वीही दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांपासून उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक निधी दिला नाही. प्रत्येकवेळी संपाची स्थिती तयार केली गेली, दिल्लीला कचराघर बनवले. आता महानगर पालिका अस्तित्वात आल्यावर स्थानिक नेत्वृत्वाशी मुख्यमंत्र्यांनी महानगर पालिकेला मिळणाऱ्या निधीवर थेट चर्चा करावी, ही समस्या सोडवून दिल्ली सरकारसह जनतेची सेवा करावी. 

}महापालिका आणि दिल्ली सरकारमध्ये सामंजस्य कसे निर्माण होणार, दिल्लीतील स्थिती कशी सुधारणार? परिस्थिती एकसारखीच आहे. महानगर पालिकेत भाजप आणि दिल्ली सरकारमध्ये आम आदमी पार्टी सत्तेत आहे? 
Àसत्तेत बसलेलापक्ष प्रत्येक काम आपल्या राजकीय फायद्यासाठी करतो. त्यामुळे दिल्ली सरकारशी सामंजस्य निर्माण करण्यात पूर्वीही अडचणी आल्या आहेत. महानगर पालिकीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महानगर पालिकेकडून हिसकावण्यात आलेले विभाग परत मिळवणार. त्यामुळे महानगर पालिकेचे उत्पन्न वाढून आर्थिक स्थिती सुदृढ होईल आणि ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकेल. 

}जाहीरनाम्यात तुम्ही दहा रुपयात थाळी बाबत आश्वासन दिलेय. ही योजना तरी काय आहे, केव्हा लागू होणार? 
Àदिल्लीत राहणाऱ्यागरीबांसाठी दहा रुपयांत भोजन उपलब्ध करणे, ही भाजपची घोषणाच नाही तर संकल्प आहे. दिल्ली महानगर पालिका दहा रुपयात आपल्या सर्व २७० वॉर्डांमध्ये गरीबांना भोजन उपलब्ध करेल. भोजन कॅलरीयुक्त, पौष्टिक आणि आरोग्यवर्धकही असेल. नगरसेवकांनी शपथ घेतल्यावर ७० दिवसांच्या आत या योजनेची अंमलबजावणी होईल. 
बातम्या आणखी आहेत...