आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणीतील कैद्यांचा सन्मान, 19 महिने तुरुंगात राहिलेल्य अडवाणींना पक्ष विसरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी - Divya Marathi
फाइल फोटो - लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आणीबाणीला चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात त्या दरम्यान तुरुंगात असलेल्या नेत्यांना सन्मानित केले. उल्लेखनिय बाब म्हणजे, या कार्यक्रमात पक्षाला ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विसर पडला आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, आणीबाणी संबंधी अडवाणींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याने पक्ष त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील देण्यात आले नाही. वास्तविक या वक्तव्याआधी भाजपने आणीबाणीसंबंधी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अडवाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आणीबाणीच्या काळात अडवाणी 19 महिने तुरुंगात राहिले होते.
19 महिने तुरुंगात
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणीबाणी दरम्यान 19 महिने तुरुंगात होते. असे असताना भाजपच्या वतीने तुरुंगात राहिलेल्या नेत्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. याबद्दल पक्षाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

काय म्हणाले होते अडवाणी
देशाच्या राजकीय व्यवस्थेत अजूनही आणीबाणी लागू होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
अडवाणी म्हणाले होते, 'भविष्यात नागरी स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.' एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, की सध्या घटनात्मक आणि कायद्याचे कवच असूनही लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या शक्तीही उपस्थित आहेत, त्यामुळे आजही आणीबाणी लागण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमाची छायाचित्रे