नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा उमेदवारीचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे. मात्र, उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच पक्षाचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी निवडणूक लढवायची तर अमृतसरमधूनच नाही तर कुठूनच नाही, असा पवित्रा घेतला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली अमृतसरमधून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. पक्षाचीही हीच भूमिका आहे. त्यामुळे सिद्धू यांना पश्चिम दिल्ली किंवा कुरुक्षेत्र येथून उमेदवारीची ऑफर दिली जात आहे. मात्र, ते अमृतसरसाठीच अडून बसले आहेत. त्यामुळे निवडणूक समितीने आज त्यांना बोलावून घेतले होते. बैठकीतून बाहेर आल्यानंतर जेव्हा त्यांना विचारले, लोकसभेचे तिकीट मिळाले नाही तर राज्यसभेची मागणी करणार का, त्यावर सिद्धू म्हणाले, आज पर्यंत पक्षाला काही मागितले नाही. मी मागणा-यांपैकी नसून देणारा आहे.
गिरिराजसिंहांची मनधरणी
बिहारमधील भाजप नेते गिरिराजसिंह नवादा येथून लोकसभा लढण्यास तयार झाले असल्याची माहिती आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा रविवारी केली जाण्याची शक्यता आहे. मोदींच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर झाल्याचे पक्षातील सुत्रांनी सांगितले आहे. गिरिराजसिंह यांना बेगुसराय येथून तिकीट हवी होते. पक्षाने मात्र त्यांना नवादा येथून मैदानात उतरवण्याची तयारी चालवली होती. त्यामुळे ते नाराज होते.
दुसरीकडे, मोदींना वाराणसीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात दिल्लीत आज (शनिवार) भाजप निवडणूक समितीची बैठक सुरु आहे. आज उत्तरप्रदेश आणि दिल्लीचे उमेदवार ठरणार आहेत. बैठकीला नरेंद्र मोदींसह वरिष्ठ नेते हजर आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार मोदी वाराणसी येथून लोकसभा लढवतील. मात्र, वाराणसीचे विद्यमान खासदार मुरली मनोहर जोशी हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत.
आज मोदी, राजनाथसिंह आणि जोशींसह अनेक दिग्गजांच्या उमेदवारीच्या घोषणेची शक्यता
पक्षाच्या सुत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदी वाराणसी येथून लोकसभा लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात आहे. येथील विद्यमान खासदार मुरली मनोहर जोशी यांना कानपूर येथून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांना लखनऊ किंवा चित्तोडगड येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. आजच्या बैठकीत गुजरात लोकसभा जागांचा निर्णय होणार नसल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे.
भाजपची संभाव्य उमेदवार यादी
नरेंद्र मोदी- वाराणसी
मुरली मनोहर जोशी- कानपुर
राजनाथ सिंह- लखनऊ
कल्याण सिंह- एटा
अरुण जेटली- अमृतसर
नवज्योतसिंग सिद्धू - कुरूक्षेत्र किंवार पश्चिम दिल्ली
जनरल व्ही. के. सिंह - जोधपुर
जसंवत सिंह- बीकानेर
कलराज मिश्र- श्रावस्ती
अजय अग्रवाल- रायबरेली
महेश शर्मा- नोएडा
केसरीनाथ त्रिपाठी- अलाहाबाद
उमा भारती- झांसी
मेनका गांधी- पीलीभीत
रमाकांत यादव- आजमगड
राजेंद्र अग्रवाल- मेरठ
या चार जागांवर निर्माण झाला आहे तिढा
भाजपमध्ये उत्तरप्रदेशच्या चार जागांवरुन पेच निर्माण झाला आहे. त्यातील गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असेलली वाराणसी आहे. त्यासोबतच लखनऊ, कानपूर आणि आयोध्या या मतदारसंघावरुनही वाद आहे.
पुढील स्लाइडमध्ये, श्रीरामलूंच्या पक्ष प्रवेशावरुन सुषमा स्वराज नाराज