आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Expels Senior Leader Jaswant Singh From Party For Six Years

जसवंतसिंहांची भाजपमधून पुन्हा एकदा हकालपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अखेर भाजपने दुसर्‍यांदा आपले ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. बाडमेरमधून जसवंतसिंह लोकसभा निवडणूक लढवत आहेत. शनिवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु जसवंत निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. त्यानंतर पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शनिवारी रात्री उशिरा त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. याआधी ऑगस्ट 2009मध्ये जिना प्रकरणानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. तेव्हादेखील राजनाथ हेच पक्षाध्यक्ष होते. त्या वेळीही जसवंत यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नव्हती. या वेळीही तसेच झाले.