आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Faces Questions This Time From Rss Chief Mohan Bhagwat

RSS प्रमुखांनी तीन भाजप नेत्यांना विचारले - का म्हणाले होते केजरीवालांना चोर?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षासह (भाजप) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देखील आत्मचिंतन करत आहे. गुरुवारी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी भाजपच्या तीन केंद्रीय मंत्र्यांना बोलावून पराभवाची कारणे विचारली.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, स्मृति इराणी आणि निर्मला सीतारमण यांना दिल्लीतील संघ कार्यालय 'केशवकुंज' येथे बोलावण्यात आले. येथे भाजपने केलेल्या नकारात्मक प्रचाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सीतारमण यांनी प्रचारादरम्यान केजरीवाल यांना 'चोर' म्हटले होते. त्यांनी या शब्दाचा वापर का केला? असा सवाल आरएसएसने केला आहे. संघाचे म्हणणे आहे, की भाजप नेत्यांनी केलेल्या नकारात्मक प्रचाराचा उलट परिणाम झाला आणि निवडणूक प्रचारादरम्यानच जनतेचा कोणाला मत द्यायचे याचा निर्णय होत गेला.
स्मृती इराणी यांच्याबद्दल संघातील काही लोकांनी तक्रार केली होती, की त्यांनी संघाशी संबंधीत काही लोकांचा सल्ला विचारात घेतला नाही. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या अहंकारी प्रवृत्तीबद्दल तक्रार केली होती. तर, काही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, की प्रचारादरम्यान त्यांच्या ऐवजी बाहेरून आलेले नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अधिक महत्त्व दिले जात होते.
या झाडाझ़डतीचे कारण
सूत्रांचे म्हणणे आहे, की संघाकडून ही झाडाझडती होण्याचे कारण या निवडणुकीतील पराभवातून धडा घेऊन आगामी निवडणुकीत अशा चुका पुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्यात येण्याची शक्यता आहे. गुरुवारी भागवत यांनी दिल्ली भाजपचे ज्येष्ठ नेते जगदीश मुखी यांचीही भेट घेतली. किरण बेदी यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी मुखी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मानले जात होते. मोहन भागवत यांनी संघ प्रचारकांना दिल्ली पराभवाचा अहवाल मागितला आहे. संघ आणि भाजप समन्वय समितीची बैठक येत्या रविवारी होणार आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत संघाचे भैय्याजी जोशी, दत्तात्रय होसबोले, कृष्ण गोपाल आणि सुरेश सोनी यांचा समावेश होता.