आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Female Candidates For Delhi Assembly Election

BJP च्या महिला उमेदवार, कोणी काँग्रेसमधून आले तर कोणी ABVP मधून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सगळेच पक्ष अत्यंत बारीक सारीक विचार करून उमेदवारांची निवड करत आहे. भाजपनेही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात भाजपने एकिकडे किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषित केले. तर दुसरीकडे नुपूर शर्मा यांना नवी दिल्लीच्या विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभे केले. तसेच भाजपने 62 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. यामध्ये 6 महिलांचा समावेश आहे.
भाजपच्या महिला उमेदवार
> तिमारपूर मतदारसंघ - रजनी अबी
> शालिमार बाग - रेखा गुप्ता
> पटेल नगर - कृष्णा तिरथ
> त्रिलोकपुरी - किरण वेद्या
> कृष्णा नगर - किरण बेदी
> नवी दिल्ली - नुपूर शर्मा

यापैकी अनेक उमेदवारांची रंजक अशी कथा आहे. किरण बेदींनी आझवर नेहमी राजकारणापासून दोन हात लांब राहणे पसंत केले होते. पण तरीही वेळप्रसंगी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर तीव्र प्रहारही केले आहेत. सध्या त्या दिल्ली भाजपच्या सर्वात मोठा चेहरा म्हणून समोर आल्या आहेत. आधी काँग्रेसमध्ये असलेल्या आणि शीला दीक्षित यांच्या खास मानल्या जाणार्‍या कृष्णा तिरथ याही आता भाजपच्या उमेदवार आहे. भाजपच्याच नुपूर शर्मा याही दिल्ली विद्यापीठाच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, भाजपच्या महिला उमेदवार...