आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bjp Forms Halla Brigade In First Timer MPs Training Camp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींनी बनवली हल्ला बोल ब्रिगेड, अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार बचाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना संसदीय कार्यपद्धतीची माहिती व्हावी यासाठी हरियाणाच्या सूरजकुंड येथे आयोजित कार्यशाळेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मोदींच्या मार्गदर्शाबरोबरच 'हल्‍ला बोल' बिग्रेड तयार करण्याबाबतही चर्चा झाली. प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना या ब्रिगेडचे महत्त्व आणि कामाविषयी माहितीही देण्यात आली.
पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचा समारोप होईल. शनिवारी सुरू झालेल्या या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या खासदारांना आचार, विचार आणि व्यवहार यावर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
एका हिंदी वृत्तपत्रामधील बातमीनुसार 7 जुलैपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्यापासून ही ब्रिगेड मोदी सरकारचा बचाव करेल. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ही ब्रिगेड विरोधकांच्या टीका आणि इथर बाबींना त्याचप्रकारे उत्तर देईल. एखाद्या वरिष्ठ खासदाराकडे या ब्रिगेडचे नेतृत्व दिले जाणार आहे. मात्र यात प्रामुख्याने प्रथमच निवडून आलेल्या खासदारांचा समावेश असेल. 16 व्या लोकसभेत भाजपचे 170 खासदार प्रथमच निवडून आलेले आहेत. तर प्रथमच राज्यसभेवर निवड झालेल्या खासदारांची संख्या 25 आहे.
काय आहे 'हल्ला बोल' ब्रिगेड?
जानकारांच्या मते संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येक मोठा पक्ष अघोषितपणे 'हल्ला बोल' ब्रिगेड तयार करत असतो. या ब्रिगेडकडे अनेक कामे असतात, ती खालीलप्रमाणे...
- संसदेची कारवाई सुरू होताच एखाद्या विशेष मुद्यावर हंगामा करत त्याबाबत चर्चेसाठी दबाव आणणे.
- विरोधी पक्षाच्या भाषणादरम्यान टीकेचा मुद्दा भरकटवणे
- भाषणादरम्यान सुरू असलेल्या अडथळ्यांना उत्तर देणे
- नेत्याने इशारा करताच थेट व्हेलमध्ये जाऊन हंगामा करणे
- एखाद्या नेत्याच्या भाषणांच्या ओळीचा पुनरुच्चार करणे आणि कधी कधी विचित्र आवाजही काढावे लागतात.

फोटो - हरियामाच्या सूरजकुंड येथे प्रथमच निवडून आलेल्या भाजप खासदरांची एक कार्यकाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी. सोबत व्यंकय्या नायडू यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.