आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Goes Ballistic, Says Narendra Modi Doesn't Need Nitish Kumar's Certificate On Secularism

नरेंद्र मोदींना नितीशकुमारांच्या प्रमाणपत्राची गरज नाही : भाजप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नरेंद्र मोदींबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेली वक्तव्ये भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागल्यामुळे सोमवारी भाजपने तिखट शब्दांत त्यांच्यावर पलटवार केला. मोदींना नितीशकुमारांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे भाजपने म्हटले आहे.


भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर दंगली झाल्या. त्यावेळी नितीशकुमार एनडीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते. भाजपच्या अन्य एक प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी सहकारी पक्ष भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर शक्ती खर्च करत आहेत. त्याऐवजी त्यांनी आपले लक्ष यूपीएचे ‘अकार्यक्षमता आणि भ्रष्ट’ सरकार हद्दपार करण्यावर केंद्रित करायला हवे. बिहार भाजपच्या काही नेत्यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे नितीशकुमार यांच्याबाबत तक्रार केली.

नितीशकुमार यांचे मौन
भाजपने कडवट शब्दांत टीका करूनही एनडीएच्या पंतप्रधानपदासंबंधीच्या प्रश्नावर नितीशकुमार यांनी मौन धारण करणेच पसंत केले. पाटण्यात यासंबंधीच्या प्रश्नांना त्यांनी बगल दिली. मला जे म्हणायचे होते, ते मी रविवारीच बोललो आहे, असे म्हणत नितीशकुमारांनी बगल दिली.