आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Has Objection On Prime Minister Proposal To Appoint Rao On Lokpal Committee

पंतप्रधानांच्या प्रस्तावाला भाजपकडून विरोध, लोकपाल समितीवरील राव यांच्या सदस्यत्वाला आक्षेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकपालच्या निवड समितीवरून सरकार आणि भाजप यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ज्येष्ठ विधिज्ञ पी. पी. राव यांचा सदस्य म्हणून प्रस्ताव ठेवला आहे. त्याला विरोधी पक्षाने आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे दाद मागितली.
लोकायुक्त म्हणून पी. जी. थॉमस यांच्या निवडीला भाजपने दोन वर्षांपूर्वी कडाडून विरोध दर्शवला होता. तसेच चित्र लोकपाल समितीच्या पदाधिकारी निवडीसंबंधी आयोजित बैठकीत दिसून आले. सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी विरोधाचा पवित्रा घेत पंतप्रधानांच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती स्वराज यांनी राष्ट्रपतींकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात पहिल्यांदाच एका यंत्रणेची स्थापना करण्यात येत आहे. त्यामुळे त्यावर सर्वांचे एकमत असले पाहिजे, असा आग्रहदेखील स्वराज यांनी केला. माजी अ‍ॅटर्नी जनरल के. परासरन यांच्या नावाची शिफारस स्वराज यांनी केली.