आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्यानंतर भाजपचे सर्वाधिक बलिदान, PM मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खवळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे मॉडेल पाहाताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा. - Divya Marathi
भाजप मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे मॉडेल पाहाताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा.
नवी दिल्ली - स्वातंत्र्यानंतर भाजपचे सर्वाधिक बलिदान राहिलेले आहे, असे म्हणत मोदींनी नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नव्या मुख्यालय इमारतीच्या भूमीपूजनावेळी मोदी बोलत होते. ते म्हणाले, 'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर कोणी सर्वाधिक बलिदान दिले असेल तर ते भाजप पक्षाने दिले आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून लागलीच प्रतिक्रिया आली आहे. मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. 'भाजपने काहीही बलिदान दिलेले नाही.' समाजात दुही माजवणे एवढे एकच काम भाजपने स्वातंत्र्यानंतर केले असल्याचा टोला काँग्रेस खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला.
काय म्हणाले होते मोदी
मोदी म्हणाले -“भाजप हा देशातला एकमेव पक्ष आहे, ज्याला सर्वाधिक प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावे लागले आहे. भाजपच्या प्रत्येक प्रयत्नाला चुकीच्या नजरेने पाहिले जाते. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक बलिदान आमच्या पक्षाच्या लोकांनी दिले आहे. ”
काही लोक आम्हाला पक्षाच्या कार्यालयासाठी जागाही मिळू देत नव्हते, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
> शहांचे हस्ते झाले भूमीपूजन..
> कुठे आहे भाजपचे जुने कार्यालय
बातम्या आणखी आहेत...