आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Denies Veteran LK Advani Wasn't Invited For Foundation Day Celebrations

भाजप स्थापनादिनी अडवाणींना डावलले, निमंत्रणच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोमवारी भारतीय जनता पक्षाचा ३६ वा स्थापना दिन होता. तो दिल्लीत हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. मात्र, ज्यांनी हा पक्ष स्थापन केला त्या संस्थापक सदस्यांनाच यासाठी निमंत्रण दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि सध्या अडगळीत टाकण्यात आलेले लालकृष्ण अडवाणी निमंत्रणाची वाट पाहत होते. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना कोणीच आमंत्रित केले नाही.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि विजयकुमार मल्होत्रा यांनी एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती. अडवाणी यांच्या खासगी सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी आतापर्यंत शिष्टाचाराप्रमाणे सूचना दिली जायची आणि अडवाणी त्या कार्यक्रमांत आर्वजून उपस्थित राहायचे. परंतु स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी पक्षाकडून निमंत्रणपत्रिका किंवा फोन आला नाही. प्रथमच दिल्लीत असूनही अडवाणी पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमास हजर नाहीत. दरम्यान, विजयकुमार मल्होत्रा सामील झाले होते; परंतु त्यांना भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून नव्हे, तर दिल्ली भाजपकडून एसएमएस पाठवण्यात आला होता. अडवाणी यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच अडगळीत टाकण्यात आले आहे.

विरोधी पक्षाच्या खोटारडेपणाला उत्तर द्या : शहा
भाजपचेराष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अमित शहा या समारंभात नेमके काय बोलणार याबद्दल स्थानिक तसेच राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ते म्हणाले, एकत्रित होऊन सरकारला यश मिळवून द्या. सरकारच्या प्रत्येक कार्यास जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधी पक्ष लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर लोकांना सत्य माहीत करून देणे पक्षकार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना सांगितले.

दाहोद (गुजरात) : भाजपच्यास्थापनादिनी सोमवारी एक लाख चौरस फुटात २५ हजार लोकांनी पक्षाचा ध्वज साकारला. ६५० गावांमधून आलेल्या लोकांपैकी ३३ टक्के लोकांनी हिरव्या रंगांची वस्त्रे परिधान केली होती. यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. पांढरा केशरी रंगांचे पोशाख परिधान करून आलेल्या लोकांनी टी-शर्ट टोप्या घातल्या होत्या. कमळातील पांढर्‍या रंगात मात्र स्थानिक कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले होते. येथे दाहोद येथील भाजपचे कार्यकर्ते बसलेले होते.