आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-‘जदयू’त तणाव; युती तुटण्याच्या स्थितीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/पाटणा- राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पंतप्रधानपदावरून सुरू झालेला भाजप व संयुक्त जनता दलातील (जदयू) वाद पराकोटीला गेला आहे. कर्नाटकात 5 मे रोजी मतदान झाल्यानंतर जदयूशी आघाडी ठेवायची किंवा नाही यावर भाजप निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मुद्द्यावर बिहारमधील भाजपचे नेते गुरुवारी, 18 एप्रिल रोजी पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांच्याशी चर्चा करणार आहेत.

राजनाथ यांनी आघाडी तुटण्याची शक्यता फेटाळली असली तरी निर्णय सर्वानुमते घेतला जाईल, असे म्हटले आहे. तत्पूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी जदयूवर टीका केली. पक्षाच्या नेत्यांची मोदींवरील टीका अनाठायी असल्याचे ते म्हणाले. पक्ष प्रवक्ते शिवानंद तिवारी म्हणाले, निर्णय भाजपनेच घ्यावयाचा आहे. 17 वर्षांपासून असलेली आघाडी तुटली तर आनंद होणार नाही, असे ते म्हणाले.

नितीश सुरक्षित
243 सदस्यसंख्येच्या बिहार विधानसभेत जदयूचे 118, तर भाजपचे 91 आमदार आहेत. याशिवाय राजदचे 22, काँग्रेसचे 4, तर 6 अपक्ष आमदार आहेत. बहुमतासाठी 122 आमदारांची गरज आहे. म्हणजेच जदयूला 4 आमदारांची गरज भासेल.