आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Lawmaker Satyapal Singh Caught In Delhi Breaking OddEven

#OddEven: पकडले गेले BJP खासदार, आपचा दावा- MPला सूट नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार सत्यपालसिंह यांची गाडी वाहतूक पोलिसांनी अडवली. - Divya Marathi
खासदार सत्यपालसिंह यांची गाडी वाहतूक पोलिसांनी अडवली.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत 1 ते 15 जानेवारी दरम्यान प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या सम-विषम क्रमांकाचा नियम तोडताना भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांच्या गाडीला वाहतूक पोलिसाने हात दिला. कारचा क्रमांक विषम असल्यामुळे इंडिया गेटजवळ खासदार सत्यपालसिंह यांची गाडी अडवण्यात आली.

का विषम क्रमांकाच्या कारने निघाले होते सत्यपालसिंह
- सत्यपालसिंह म्हणाले, मला सुरक्षा मिळाली आहे, त्यामुळे या नियमातून सुट आहे.
- ते म्हणाले, 'मी इंडिया गेट येथे गेलो होतो. मी तिथे माझी गाडी पार्क केली होती. एक व्यक्ती माझ्या कारचा फोटो घेत होता, तेव्हा मी मला तिथे कार पार्क करायला सांगणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला बोलावले.'
- मात्र, आम आदमी पार्टीने दावा केला आहे, की या नियमातून खासदारांना सुट देण्यात आलेली नाही.
- सत्यपालसिंह मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आहेत. ते बागपत येथून विजयी झाले आहेत.
'आप' काय म्हणाले
- पक्षाचे प्रवक्ते आशुतोष म्हणाले, 'सत्यपालजी चूक मान्य करण्यात काही गैर नाही. ते पकडले गेले आहेत. भाजपची इच्छाच आहे की सम-विषम नियमाचा बोजवारा उडावा.'
- त्याच बरोबर आपने म्हटले आहे, की खासदारांना या नियमातून सुट दिलेली नाही.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल साइटवर सत्यपालसिंह याचा फोटो रिट्विट केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सचिवालयात निघालेले अरविंद केजरीवाल