आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Lalkrishna Adwani Comment On Loksabha Election

एप्रिल 2014 पूर्वीच लोकसभा निवडणुका; लालकृष्‍ण अडवाणींचे भाकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- येत्या एप्रिल 2014 पूर्वीच लोकसभेच्या न‍िवडणुका होतील, एवढेच नाही तर त्यात भारतीय जनता पक्षाला रेकॉर्डब्रेक यश मिळेल, असे भाकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मांडले आहे. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या संमेलनात अडवाणी बोलत होते.

दुसरीकडे, अडवाणीचे भाकीत म्हणजे हवेत बंगला बांधण्यासारखे असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींनी केली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतरच सर्व स्पष्ट होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुका मुदतपूर्व होतील. त्याचबरोबर उत्तरप्रदेशात भाजपच क्रमांक एकचा पक्ष बनेल, असे एका सर्व्हेक्षणाच्या अहवालात समोर आले आहे.

सर्वेनुसार यूपीमध्ये भाजपला 29 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2009मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले होते.