आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपा गांगुली यांना राज्यसभेवर संधी, सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली होते सीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रूपा गांगुली यांनी याचवर्षी भाजपच्या तिकिटावर पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. - Divya Marathi
रूपा गांगुली यांनी याचवर्षी भाजपच्या तिकिटावर पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.
नवी दिल्ली - अॅक्ट्रेस आणि भाजपच्या लीडर रुपा गांगुली यांना राज्यसभेसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. यावर्षी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 49 वर्षांच्या रुपा यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राज्यसभेत नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर एक जागा रिकामी झाली होती. भाजपबरोबरच्या वादामुळे सिद्धू यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांचा स्वतंत्र राजकीय पक्षही स्थापन केला आहे.

महाभारत मधून मिळाली प्रसिद्धी..
- रूपा यांना 1988 मध्ये टिव्हीवर झळकलेल्या 'महाभारत' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. रुपा यांनी द्रोपदीची भूमिका केली होती.
- 1990 आणि 2000 च्या दशकात त्यांनी अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतही भूमिका केल्या. 2012 मध्ये रूपा यांना बंगाली चित्रपटात 'अबोशेशे' गाण्यासाठी बेस्ट प्लेबॅक सिंगरचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
- 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
- एप्रिल महिन्यात सुब्रमण्यम स्वामी, नरेंद्र जाधव, नवज्योत सिंग सिद्धू, सुरेश गोपी, स्वप्न दासगुप्त आणि मेरी कोम यांनाही राज्यसभेसाठी नॉमिनेट करण्यात आले होते.
- देशाच्या विकासासाठी काम करायचे असून गांभीर्याने जबाबदारी पार पाडणार असल्याचे रूपा गांगुली यांनी म्हटले आहे.
- रूपा बंगाल बीजेपीच्या राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षही आहेत.
बातम्या आणखी आहेत...