दरम्यान, भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर 'हवाला'च्या माध्यमातून पक्ष निधी जमा केल्याचा आरोप केला आहे. या स्थितीत केजरीवाल यांना प्रामाणिक म्हणून शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपच्या मताशी असहमती दर्शवली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
तसे पाहिले तर, बॉलिवूडमधून राजकारणात आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी यापूर्वीही पक्षाची सीमा ओलांडून वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान
नरेंद्र मोदीऐवजी शत्रुघ्न सिन्हा यांनी नीतिशकुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून संबोधले होते. त्यावर चौफेर टीका झाल्यानंतर सिन्हा यांनी युटर्न घेतला होता.
मोदी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गेल्या महिन्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेते मुंबईत झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुश याच्या विवाह समारंभात उपस्थिती दिली होती.
'तृणमूल'च्या पाठिंब्यावरून राजकारण सुरु...
तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप' मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आता त्यावरून राजकारण सुरु झाले आहे. 'आप'चे नेते आशीष खेतान म्हणाले की, पाठिंबा कुठूनही मिळू द्या आम्ही त्याचे स्वागत करतो.
तृणमूल कॉंग्रेसचे जहान पाण्यात बुडत असताना ते 'आप'च्या जहाजाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे भाजपचे नेते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, ममता बॅनर्जी यांनी केलेला ट्विट...