आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bjp Leader Shatrughan Sinha Praises Arvind Kejriwal Mamata Banerjee Appeals For Aap

शत्रुघ्न सिन्हांनी केली केजरीवालांची प्रशंसा तर ममता म्हणाल्या-AAPला करा मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: शत्रुघ्न सिन्हा आणि ममता बनर्जी)

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज (गुरुवारी) सायंकाळी थंडावल्या. दिल्लीत 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मात्र, मतदानापूर्वी दिल्लीतील बदलते चित्र पाहून भाजपची झोप उडाली आहे. त्यात बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांना 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांची प्रशंसा करून आपल्या पक्षाला जोरदार झटका दिला आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीकरांना 'आप'ला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी अरविंद केजरीवाल यांनी एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून संबोधित केले आहे. तसेच आम आदमी पक्ष (आप) भाजपला तगडे आव्हान देत असल्याचे म्हटले आहे. शत्रुघ्न सिन्हा एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

दुसरीकडे, तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बनर्जी गुरुवारी भाजपविरोधात मैदानात उतरल्या. ममतांनी 'टि्वटर'च्या माध्यमातून सर्व दिल्लीकरांना 'आप'ला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 'राजधानीचा विकास ही देशाला गरज असून दिल्लीतील सर्व मतदारांनी आम आदमी पक्षाच्या (आप) उमदेवारांना मतदान करून विजयी करावे', अशी पोस्ट ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
यापूर्वी बिहारमधील जदयूने देखील केजरीवाल यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. कोट्यवधींच्या देणगीप्रकरणी संशयाच्या भोवर्‍यात सापडलेल्या 'आप'च्या बचावासाठी खुद्द नीतीशकुमार धावून आले होते.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, दिल्लीत 'आप'ला विजयाची संधी आहे म्हणून मला अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आहे. मात्र, भाजपने किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवाराच्या रुपात मैदानात उतरवले आहे. दिल्लीत खरी लढत किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात होत आहे. दोन्ही प्रामाणिक नेते आहेत.

दरम्यान, भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर 'हवाला'च्या माध्यमातून पक्ष निधी जमा केल्याचा आरोप केला आहे. या स्थितीत केजरीवाल यांना प्रामाणिक म्हणून शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपच्या मताशी असहमती दर्शवली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

तसे पाहिले तर, बॉलिवूडमधून राजकारणात आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी यापूर्वीही पक्षाची सीमा ओलांडून वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदीऐवजी शत्रुघ्न सिन्हा यांनी नीतिशकुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून संबोधले होते. त्यावर चौफेर टीका झाल्यानंतर सिन्हा यांनी युटर्न घेतला होता.
मोदी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेते मुंबईत झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुश याच्या विवाह समारंभात उपस्थिती दिली होती.

'तृणमूल'च्या पाठिंब्यावरून राजकारण सुरु...
तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप' मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आता त्यावरून राजकारण सुरु झाले आहे. 'आप'चे नेते आशीष खेतान म्हणाले की, पाठिंबा कुठूनही मिळू द्या आम्ही त्याचे स्वागत करतो.

तृणमूल कॉंग्रेसचे जहान पाण्यात बुडत असताना ते 'आप'च्या जहाजाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे भाजपचे नेते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, ममता बॅनर्जी यांनी केलेला ट्‍विट...