आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीजवळ नोएडात भाजप नेत्यासह तिघांचा खून, हल्लेखोरांनी कारवर झाडल्या 12 गोळ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप नेते शिवकुमार हे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
भाजप नेते शिवकुमार हे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली- दिल्लीतच्या ग्रेटर नोएडातही या गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. बाईकस्वार असलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भाजप नेत्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्या भाजप नेत्यासमवेत तिघांचा मृत्यू झाला आहे. ते फॉर्च्यूनर कारमधून गाझियाबाद येथून परतत असताना ही घटना घडली.

 


शाळेतून घरी परतत होता हा भाजप नेता


- शिवकुमार हे हैबतपूर येथे माँ भगवती शाळा चालवत होते. दुपारी ते कारने गाझियाबादहून प्रताप विहार येथील घराकडे परतत होते. 

- स्थानिक भाजप नेते शिवकुमार स्वतःच्या सुरक्षारक्षकांसमवेत जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या गुन्हेगारांनी भाजप नेत्याच्या फॉर्च्युनर कारवर अंदाधुंद गोळीबार केला आहे.

- भाजप नेत्यासह त्या तिघांनाही गोळ्या लागल्या आहेत. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिवकुमार व त्याच्या दोन सुरक्षारक्षकांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...