आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Likely To Be Asked To Form Government In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली : भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण मिळणार? उपराज्यपालांचे राष्ट्रपतींना पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. उपराज्यपाल नजीब जंग यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा असणा-या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्यासंदर्भात परवानगी मागणारे पत्र राष्ट्रपतींना लिहिले आहे. दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 29 जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या या निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपनंतर अलविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) भादपनंतर सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.
दिल्लीत 15 वर्षे उपभोगल्यानंतर केवळ 8 जागा मिळवणा-या काँग्रेसच्या पाठिंब्यावर केजरीवाल दिल्लीत सत्ता स्थापन केली होती. पण केजरीवाल यांना अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. त्यांनी 49 दिवसांत राजीनामा देत सत्ता सोडली होती. जनलोकपाल विधेयकाच्या मुद्यावरून त्यांनी राजीनामा दिला होता.

उपराज्यपालांनी राष्ट्रपतींकडे केलेली शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे. भाजपला बहुमत सिद्ध करण्याची एक संधी मिळायला हवी अशी शिफारस नजीब जंग यांनी केली आहे. दरम्यान आम्ही सत्ता स्थापन करू शकतो की, नाही याचा आढावा घ्यावा लागणार असल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसने भाजप बहुमत कसे मिळवणार? असा सवाल करत पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर दिल्ली भाजप सत्ता स्थापनेसाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नात असल्याचे म्हटले जात आहे. आपनेही अनेकदा भाजपवर सत्ता स्थापनेसाठी घोडेबाजार केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच उपराज्यपालांवरही भाजपला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केजरीवालांनी नव्याने निवडणुका व्हाव्यात यासाठी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली असून, त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दिल्‍ली विधानसभेतील सद्यस्थिती
भाजप - 28
शिरोमणी अकाली दल - 1
काँग्रेस - 8
आम आदमी पार्टी - 27
जेडीयू - 1
अपक्ष - 2