आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Likely To Lose Battle To AAP In Delhi Elections As Per Exit Polls

चारपैकी दोन EXIT POLLS मध्ये AAP ला पूर्ण बहुमत, चाणक्यने दिल्या तब्बल 48 जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत आज झालेल्या मतदानाच्या आकड्यांवरुन आम आदमी पक्षाला फायदा होताना दिसून येत आहे. भाजपच्या डोक्यावर 'आप' तांडवनृत्य करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'आप'ला पूर्ण बहुमत मिळाले तर दिल्लीत या पक्षाचे सरकार सत्तेत येऊ शकते. पण वाढलेल्या टक्केवारीचा फायदा भाजपला झाला तर पुन्हा त्रिशंकू स्थिती राहण्याची शक्यता आहे. सायंकाळी सहापर्यंत दिल्लीत एकूण 67 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत आलेल्या चारपैकी दोन एक्झिल पोलमध्ये आपला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
2013 मध्ये भाजप आणि अकाली दलाला 32, आपला 28 आणि कॉंग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. यावेळी आपला कॉंग्रेससोबत आघाडी करुन सत्ता स्थापन करावी लागली होती. भाजप आणि आपचे गणित गेल्या वेळी काही जमले नव्हते. जर आताही त्रिशंकू स्थिती राहिली तर पुन्हा आप आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर असेल. सरकार स्थापनेसाठी पुन्हा घोडेबाजार दिसण्याची शक्यता आहे.
पण दोन एक्झिट पोलने पूर्ण बहुमत तर दोन एक्झिट पोलने निसटते बहुमत दिले असल्याने दिल्लीत आपली सत्ता येणार असल्याचे जवळपास पक्के मानले जात आहे. असे झाले तर अरविंद केजरीवाल यांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदाची माळ असेल. पक्षाला सिद्ध करण्यासाठी त्यांना पुन्हा एक संधी मिळेल. याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होताना दिसून येईल. कारण दिल्लीच्या निमित्ताने पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांचा विजयी रथ थांबलेला दिसून येईल.
न्यूज 24 - चाणक्य 2015 चा एक्झिट पोल 2013 चा एक्झिट पोल
आप 48 31
भाजप 22 29
कॉंग्रेस 0 10
एबीपी नील्सन 2015 चा एक्झिट पोल प्री-व्होटिंग सर्व्हे 2013 चा एक्झिट पोल
आप 39 35 15
भाजप 28 29 37
कॉंग्रेस 3 6 16
इंडिया टुडे - सीसेरो 2015 चा एक्झिट पोल प्री-व्होटिंग सर्व्हे 2013 चा एक्झिट पोल
आप 35-43 19-25 06
भाजप 28 38-46 41
कॉंग्रेस 3 -- 20
टाइम्स नाऊ - सी वोटर 2015 चा एक्झिट पोल प्री-व्होटिंग सर्व्हे 2013 चा एक्झिट पोल
आप 31-39 31 11
भाजप 27-35 36 31
कॉंग्रेस 2-4 2 24
सध्या अशी आहे जागांची स्थिती
पार्टी 2013 विधानसभा निवडणूक 2014 लोकसभेत झालेली वाढ
भाजप+ 32 जागा 60 जागांवर
आप 28 जागा 9 जागांवर
कॉंग्रेस 8 जागा 1 जागेवर
दिल्लीत गेल्या निवडणुकांमध्ये किती राहिले व्होटिंग पर्सेंटेज
वर्ष व्होटिंग कुणाला फायदा
2014 65.07% (लोकसभा) भाजप : सात जागा मिळाल्या
2013 66% भाजप आणि आप
2008 57.58% कॉंग्रेस
2003 53.4% कॉंग्रेस
1998 49% कॉंग्रेस
1993 61.8% भाजप