आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP LJP Modi Ramvilas Paswan Latest Politics News

BJP-LJP युती आणि मोदींच्या मतदारसंघावरून आज पडद उठणार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहाणार आहे. पक्षाचे लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी आज संसदीय बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहाणार आहेत. मोदी लोकसभेची निवडणूक कोठून लढविणार याचाही निर्णय होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आज मोदींना भेटण्याची शक्यता आहे. पासवान यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर त्यांच्या पक्षात बंडखोरी झाली आहे. लोकजशक्ती पक्षाच्या बिहारमधील एकमेव आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
भाजपमध्ये अनेक दिग्गजांचा सध्या प्रवेशसोहळा होत आहे. यात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगदंबिका पाल यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. जगदंबिका पाल हे उत्तरप्रदेशमधील डुमरिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. 1998 मध्ये ते तीन दिवस उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. उत्तरप्रदेश भाजपमधील एक गट त्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या विरोधात आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काँग्रेसने 28 पर्यंत मागवले अर्ज