आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Makes New Stratagy For Muslim Support To Narendra Modi

मुस्लिम समाजाचा पाठिंबा नरेंद्र मोदींना मिळावा यासाठी भाजपची नवी रणनीती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुस्लिमांना नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाकडून कोणताही धोका नसल्याचे पटवून देण्यासाठी पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाने नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार, दहशतवादाच्या मुद्द्यावरून या समाजातील लोकांवर होणारे अन्याय व अत्याचार बंद करावेत, अशी मागणी करण्यात येईल.

पक्षाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे यासंबंधीचा दस्तऐवज तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान याचे प्रकाशन प्रत्येक राज्यात होणार आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये पक्षाचे काही पदाधिकारी तसेच विचारवंत आणि अल्पसंख्यांकांतील धर्मगुरूंचाही समावेश करण्यात आला आहे. या समाजाविषयीचे सत्य जनतेला कळावे म्हणून हा प्रयत्न असल्याचे नक्वी यांनी सांगितले.