(फाइल फोटो : चर्चा करताना नरेंद्र मोदी, केशुभाई व इतर.)
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, छत्तीसगडच्या राज्यपालांनी राजीनामे सादर केलेल आहेत. तर इतरही अनेक राज्यांच्या राज्यपालांवर पद सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यातच केंद्रात सत्ता असणा-या भाजपने आपल्या नेत्यांना राज्यपाल बनवण्याची तयारी सुरू केली आहे.
डॉ. मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, केसरीनाथ त्रिपाठी, लालजी टंडन, ओमप्रकाश कोहली, यशवंत सिन्हा, केशुभाई पटेल आणि कैलास चंद्र जोशी अशा नेत्यांचा या यादीत समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकारने या माध्यमातून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसाठी भूमिका ठरवली आहे. या नेत्यांना त्यांच्या ज्येष्ठत्वानुसार जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी मोदी सरकारने निवृत्त नोकरशहांना राज्यपाल बनवणार नसल्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
केशुभाई पटेल
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या समोरच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात अत्यंत वेगाने असे यश मिळवले होते. मोदी त्यांना आपले राजकीय गुरूही मानतात. कदाचित त्यामुळेच पटेल यांचे नाव राज्यपाल पदासाठी समोर आलेले आहे. या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजपने 2001 मध्ये केशुभाई पटेल यांना हटवून त्यांच्याजागी नरेंद्र मोदी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे दोघांमध्ये बराच काळ तणावही निर्माण झाला होता. केशुभाई पटेल यांनी वारंवार मोदींवर टीका केली आहे. मात्र, 2007 आणि 2012 च्या निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर मोदींनी पटेल यांचे आशिर्वाद घेऊन कृतज्ञता व्यक्त केली होती.
पुढे वाचा..राज्यपाल पदाच्या शर्यतीतील इतर नेत्यांबाबत