आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी हे गांधींपेक्षा मोठा ब्रँड : विज, वाद चिघळताच वक्तव्य मागे घेतले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खादीच्या कॅलेंडर आणि डायरीवरून म. गांधींचे छायाचित्र हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापल्याचा वाद पेटला असतानाच हरियाणाचे मंत्री व भाजप नेते अनिल विज यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याने वादात तेल ओतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींपेक्षा मोठे ब्रँड आहेत. जेव्हापासून गांधीजींचे छायाचित्र छापले, तेव्हापासून खादी बुडाली. गांधींचे छायाचित्र नोटांवर छापल्यामुळे रुपयाचे अवमूल्यन झाले. आता नोटांवरूनही गांधींचे छायाचित्र काढून टाकले जाईल, असे बेमुर्वतखोर वक्तव्य ज्येष्ठ भाजप नेते व हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी केले आहे. त्यांच्या  या वक्तव्यावर चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी लगेच आपले वक्तव्य मागे घेत हे वैयक्तिक मत असल्याचे सांगत सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला.  
 
वीज यांच्या वक्तव्याचा काँग्रेससह विरोधी पक्ष चांगलेच भडकले. सोशल मीडियावर वीज आणि भाजपवर अतिशय कडवट शब्दांत टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. भाजपने नेहमीच द्वेष पसरवण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातून मोदींच्या स्मृती पुसून टाकू पाहत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. टीकेची झोड उठताच ‘ गांधींजीबाबत मी जे वक्तव्य केले ते माझे वैयक्तिक मत आहे. कोणाच्याही भावना दुखावू नये म्हणून मी ते मागे घेत आहे, असे ट्विट वीज यांनी केले आहे. भाजपनेही वीज यांच्या वक्तव्याशी आपला संबंध नसल्याचे सांगत वीज यांचा निषेध केला आणि गांधीजी आमचे आयकाॅन असल्याचे सांगितले. वीज यांचे वक्तव्य वैयक्तिक आहे. ती भाजपची भूमिका नाही. आम्ही त्या वक्तव्याचा निषेध करतो, असे भाजप प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी म्हटले आहे. तर  ‘यह नालायक बेटे है देश के. बहोत दुर्भाग्य की बात है,’अशी टीका राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.
 
ही तर संघाचीच भाषा :
हा ‘हायकमांड’चा ‘नियोजनबद्ध’प्रचार असून मंत्री अनिल वीज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच भाषा बोलत आहेत. राजकीय नेते ज्या पद्धतीने भ्रष्ट कामांसाठी पैशाचा वापर करत आहे, तो पाहता बापूंचा फोटो नोटेवरून काढलेलाच चांगले राहील, असे म. गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी उद्वेगाने म्हटले आहे. 
 
ब्रिटिशांनी केले तेच भाजप करत आहे : काँग्रेस
ब्रिटिशांनी जे केले तेच भाजप करत आहे. म. गांधी हे भारताचा आत्मा आहेत. अशा प्रकारचे आक्षेपार्ह व मूर्खपणाचे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्रीच करू शकतात.  गांधीजींचा खून केला जाऊ शकतो. त्यांची छायाचित्रेही काढून टाकली जाऊ शकतात. पण गांधीजी भारताच्या आत्म्यात कायम राहातील, हे मोदी, अनिल वीज व भाजपने लक्षात घ्यावे.
रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित बातमीचे फोटोज...