आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bjp Mp Comes To Defend Sushma Sawraj Says Party Insider Conspire Against Bjp Leader

ललित मोदींना मदतीवरुन वादंग, सुषमा यांच्या कन्येने सातवेळा केला युक्तीवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललित मोदीसोबत सुषमा स्वराज आणि त्यांची मुलगी बासुंरी स्वराज - Divya Marathi
ललित मोदीसोबत सुषमा स्वराज आणि त्यांची मुलगी बासुंरी स्वराज
नवी दिल्ली- भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर विरोधी पक्षांनी हितसंबंधाचा आरोप केला आहे. विरोधीपक्षाचे म्हणणे आहे, की परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज ललित मोदींची वकील राहिलेली आहे. ललित मोदीच्या लीगल टीममध्ये बांसुरीची महत्त्वाची भूमिका होती. सुषमा स्वराज यांनी देखील हे मान्य केलेले आहे. स्वराज यांनी मोदीसंदर्भात झालेल्या आरोप मान्य करताना मानवतेच्या नात्याने ललित मोदीला पोर्तुगालला जाण्यासाठी कागदपत्रांची सज्जता केल्या मान्य केले आहे. यासोबतच त्यांच्यावर आरोप होता, की सुषमा यांच्या पतीने पुतण्याला ब्रिटनच्या विद्यापीठात कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत मागितली होती. तेव्हा सुषमा स्वराज लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या होत्या.
कोण आहे बांसुरी ?
बांसुरी स्वराज सुषमा यांची कन्या आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातून तिने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. ललित मोदींच्या पासपोर्ट प्रकरणात त्यांच्या लीगट टीममध्ये तिचा समावेश होता. दिल्ली हायकोर्टात एप्रिल 2012 ते ऑगस्ट 2014 दरम्यान हे प्रकरण सुरु होते.

सातवेळा केला युक्तीवाद
बांसुरी ललित मोदीच्या वकील आहेत. त्यांनी मोदींचा त्यांचा पासपोर्ट मिळावा यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. बांसुरी यांनी मोदीच्या वकील म्हणून सात वेळा कोर्टात युक्तीवाद केला आहे. 2013 मध्ये पाच वेळा आणि 2014 मध्ये दोन वेळा त्यांनी कोर्टात त्यांची बाजु मांडली.
ईडीच्या नोटीशीने मोदी कायद्याच्या कचाट्यात
ललित मोदींच्या या प्रकरणाची सुरुवात मे 2010 मध्ये झाली होती. मोदींनी फेमा कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) ललित मोदींना नोटीस पाठवली होती. त्यावर मोदींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर 2011 मध्ये मुंबईतील विभागीय पासपोर्ट कार्यालयाने त्यांचा पासपोर्ट (No. Z-1784222) रद्द केला होता. या निर्णयाला ललित मोदींनी 18 एप्रिल 2012 मध्ये कोर्टात आव्हान दिले होते.
हायकोर्टात ललित मोदींची बाजू मांडत होती सुषमा स्वराज यांची कन्या
पासपोर्ट रद्द करण्याच्या निर्णयाला ललित मोदींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावेळी मोदींच्या लीगल टीममध्ये बांसुरी स्वराजचा समावेश होता. मोदींच्या वतीने कोर्टात ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली होती. रोहतगी सध्या देशाचे अॅटॉर्नी जनरल आहेत. त्यावेळी बांसुरी यु. यु. ललित यांची सहायक होती. त्यांनी अनेक प्रकरणात मोदींचे वकीलपत्र घेतलेले होते. ते सध्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत.

ईडीने लावले होते गंभीर आरोप
जानेवारी 2013 मध्ये दिल्ली हायकोर्टाच्या एक सदस्यीय पीठाने ललित मोदींचे पासपोर्टचे अपील फेटाळले होते. जस्टिस राजीव शाकेधर यांनी ईडीने उपस्थित केलेल मुद्ये महत्त्वाचे आणि देश हिताचे असल्याचे नमुद केले होते. त्यावेळी ईडीने चिंता व्यक्त केली होती, 'देशाच्या आर्थिक हिंचा आदर राखून आम्हाला अशा व्यक्तीची चौकशी करायची आहे ज्याने शेकडो कोटी रुपये देशाबाहेर जमा केले आहेत.' या प्रकरणाच्या रेकॉर्ड्स नुसार त्यावेळी ललित मोदींच्या वतीने बांसुरी कोर्टात हजर होती.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, काय आहे प्रकरण