आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदार महेश गिरींचे केजरींविरुद्ध उपोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे खासदार महेश गिरी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसले. केजरीवाल यांनी त्यांच्यावर एनडीएमसीचे वकील एम. एम. खान यांच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. यावर गिरी यांनी मुख्यमंत्र्यांना दुपारी ४ वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. मात्र, केजरीवाल तिथे आले नाहीत.

गिरी म्हणाले, केजरीवाल स्वत: येऊन बोलणार नाहीत तोपर्यंत उठणार नाही. केजरीवाल यांनी खुनात माझा सहभाग असल्याचे आरोप सिद्ध करावेत किंवा राजीनामा द्यावा. केजरीवाल यांनी चर्चा करावी, अशी माझी इच्छा होती. मात्र, ते चर्चेसाठी न आल्यामुळे मी उपोषण करण्याचा मार्ग अवलंबला. आता केजरीवाल जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत अन्न-पाणी घेणार नाही, असा इशाराही गिरी यांनी या वेळी दिला. दुसरीकडे, भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गिरींना पाठिंबा दिला आहे.

हे आहे प्रकरण
नायब राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी लिहिले होते, मोदीजी तुमच्यावर खुश असल्याचे ऐकले आहे. एम. एम. खान यांच्या हत्येत भाजप खासदार महेश गिरी आणि माजी आमदार कंवरसिंह तंवर यांची नावे समोर येत आहेत. मात्र, तुम्ही दोघांचा बचाव केला.
बातम्या आणखी आहेत...