आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या IAS अधिकाऱ्याने करायला लावली होती आडवाणींना अटक, मोदी सरकारमध्ये झाले मंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. के, सिंह यांनी 1990 मध्ये आडवाणींना अटक केली होती. - Divya Marathi
आर. के, सिंह यांनी 1990 मध्ये आडवाणींना अटक केली होती.
पाटणा- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना रथयात्रेदरम्यान बिहारमध्ये अटक करणाऱ्या आर. के. सिंह यांना सरकारने राज्यमंत्री केले आहे. ते भाजपचे खासदार आहेत. समस्तीपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी असणारे आर. के. सिंह यांनी 30 ऑक्टोबर 1990 रोजी रथयात्रेदरम्यान आडवाणींना अटक केली होती. त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे होते. आर. के, सिंह 1975 बॅचचे आयएएस अधिकारी होते. 
 
- 2014 मध्ये आरा येथे पहिल्यादा भाजपच्या तिकिटावर खासदार बनलेले राज कुमामर सिंह याच्यासाठी राजकारणात हे सर्वकाही पहिल्यांदाच घडत आहे.
- सेवानिवृत्त झाल्यानंतर राजकारणात आलेले आर. के. सिंह हे पहिल्यादाच खासदार आणि मंत्री बनले आहेत.
- एक कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
- आर. के. सिंह यांनी पूर्व केंद्रीय गृह सचिव समवेत अनेक महत्वपूर्ण पदे सांभाळली आहेत. त्यांना कायद्यांचीही चांगली माहिती आहे.
- त्यांनी अनेकदा पाकिस्तानविरोधी अतिशय कडक शब्दांचा वापर केला आहे. मार्च 2017 मध्ये त्यांनी कोणीही भारतविरोधात घोषणाबाजी केल्यास त्याचे आम्ही हात-पाय तोडू असे म्हटले होते.
- त्यांनी अनेकदा पाकिस्तानविरोधी अतिशय कडक शब्दांचा वापर केला आहे. मार्च 2017 मध्ये त्यांनी कोणीही भारतविरोधात घोषणाबाजी केल्यास त्याचे आम्ही हात-पाय तोडू असे म्हटले होते.
- बिहार सरकारमध्ये पथ निर्माण विभागाचे सचिव असलेल्या सिंह यांच्या काळात बिहारमधील रस्त्यांची स्थिती सुधारली होती. याशिवाय अनेक विभाग सिंह यांनी सांभाळले आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...