आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP MP Yogi Adityanath Asks Supporters To Convert 100 Muslims For 1 Hindu Girl

एका हिंदु मुलीच्या मोबदल्यात 100 मुस्लीम मुलींचे धर्मांतर करू : योगी आदित्यनाथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये आदित्यनाथ म्हणत आहेत, 'त्यांनी एका हिंदु मुलीचे धर्मांतर केल्यास आम्ही 100 मुस्लीम मुलींचे धर्मांतर करू, असा निर्णय आम्ही घेतला आहे.' पण हा व्हिडिओ जुना असल्याचे आदित्यनाथ म्हणाले आहेत. हा व्हिडिओ कधी आणि कुठे रेकॉर्ड केला आहे, हेही स्पष्ट होत नाही.

काय म्हणाले खासदार महोदय?

गेल्यावेळी उत्तर प्रदेश हायकोर्टाच्या निर्णयाने माझ्या चिंता वाढवल्या होत्या. हिंदु मुली मुस्लीम पुरुषांबरोबर विवाह का करत आहेत? अशी विचारणा हायकोर्टाने केली होती. त्याची चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले होते. उत्तर प्रदेश सरकारला यावर काहीही निर्णय घेता आला नाही. गोरखपूरच्या एका तरुणाने कोर्टाच्या एका आदेशाला आव्हान दिले होते. गोरखपूरमध्ये मुस्लीम मुलींचा हिंदु कुटुंबांममध्ये विवाह होतो. आम्ही या पंरंपरेचा स्वीकार केला आहे. जर एखाद्याला हिंदु धर्म स्वीकार करायचा असेल तर, आम्हाला काही हरकत नाही. त्यासाठी संबंधित व्यक्तीचे शुद्धीकरण केले जाईल. त्यामुळे एका नव्या जातीचा उदय होईल, असे आदित्यनाथ या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

विरोधकांची टीका
व्हिडिओ समोर येताच, भाजपच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आङे. त्यांच्या मते भगवी ब्रिगेड देशात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढील स्लाइड्वर पाहा, आदित्यनाथ यांचे काही PHOTO