आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP MP Yogi Adityanath Attacked Shahrukh Khan Over His Statement

असहिष्णुतेचा वाद : शाहरुख-हाफिजची भाषा एकच, योगी आदित्यनाथ यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/लखनऊ/रांची - देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या वक्तव्यावरून उफाळलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. शाहरुखच्या वक्तव्यावर बुधवारी भाजप खासदार योगी आदित्यनाथ, चित्रपट अभिनेता सलमान खान आणि बाबा रामदेव यांच्यासह अनेकांनी आपले मत नोंदवले. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी शाहरुखला देशविरोधी म्हणणारे वक्तव्य मागे घेतले, तरी योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाला आणखी हवा दिली.

आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद आणि शाहरुख यांची भाषा एकच असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘सईदच्या प्रस्तावावर शाहरुखने उत्तर द्यावे. ज्या भारताने त्याला मानसन्मान, प्रसिद्धी सर्वकाही दिले, त्या देशाला असहिष्णु म्हणणे त्याच्या बदलत्या मानसिकतेचे दर्शन घडवते. या देशातील बहुसंख्याक समाजाने जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर त्यालाही सर्वसामान्य मुस्लिमांसारखे भटकावे लागेल.

शाहरुखने पुरस्कार, कमाई परत करावी : बाबा रामदेव
बाबा रामदेव म्हणाले , धार्मिक असहिष्णुतेच्या मुद्द्यावर शाहरुख खानला खरोखरच चिंता वाटत असेल तर त्याने पद्मश्री पुरस्कार परत करावा. पुरस्कार मिळवल्यानंतरची सर्व कमाई परत करावी. पुरस्कार परत करणारे कुठला त्याग करत आहेत. जर परत करायचेच असेल तर पुरस्कार मिळवल्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीद्वारे मिळवलेली संपूर्ण संपत्ती राष्ट्रीय कोशात जमा करावी. पुरस्कार तर कागदाचा तुकडा आहे. परत करायचीच असेल तर जमीन जायदाद तिच्या मूळ कागदपत्रांसह परत करावी. ती मोदींनी घ्यावी आणि ती राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी. हे सर्व काही मोफत प्रसिद्धीसाठी सुरू आहे. या लोकांनी काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी आपल्या राजकीय ब्रँडिंगसाठी हे पुरस्कार दिले होते. आता ते राजकीय फायदा घेण्यासाठी पुरस्कार परत करत आहेत.

आता भारतात कार्यक्रम नाही : गुलाम अली
आता भारतात कार्यक्रम करणार नाही, अशी घोषणा पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी बुधवारी केली. ते म्हणाले, विपक्षीय मुद्द्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत भारतात गाणार नाही. त्यांनी सर्व प्रस्तावित कार्यक्रमही रद्द केले. शिवसेनेने त्यांच्या कार्यक्रमांना विरोध केला होता.

सलमान म्हणताे, आपण सर्व भारतीय
अभिनेता सलमान म्हणाला, ‘आपण सर्वजण भारतीय आहोत. आज जसे वातावरण आहे तसेच ते राहायला हवे.’ दुसरीकडे त्याचे वडील सलीम खान म्हणाले, ‘मुस्लिमांना राहण्यासाठी जगात भारतापेक्षा दुसरा चांगला देश कुठलाही असू शकत नाही. मुस्लिमांना या देशात राहायचे असेल तर त्यांनी हा देश, संस्कृतीचा मान ठेवायला हवा. तुम्हाला पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक अथवा इराणमध्ये जाऊन राहणे आवडेल का, असा प्रश्न मी मुस्लिमांना विचारू इच्छितो.

संसदेत चर्चेसाठी तयार : नायडू
केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले की, असहिष्णुतेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. कोणीही अशी निरर्थक वक्तव्ये करू नयेत. त्यांनी शाहरुख खान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्याविरोधात भाजपच्या काही नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्येही अमान्य केली.

जिभेवर नियंत्रण ठेवावे : अनुपम खेर
अभिनेता अनुपम खेर यांनी शाहरुखच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांना जिभेवर नियंत्रणाचा सल्ला दिला. त्यांनी ट्विट केले की, भाजप नेत्यांनी शाहरुखच्या वक्तव्यावरून वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत. शाहरुख सर्वांचा आदर्श आहे. भारतीयांना त्याच्याबद्दल आदर आहे. प्रत्येक पक्षात काही वाईट तत्त्वे असतात. त्यावरून पंतप्रधान, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही.