आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी करणार \'चाय पे चर्चा\', डिनर पार्टीत खासदारांना दिला आक्रमक प्रचाराचा सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) 'चाय पे चर्चा' अभियान आजपासून सुरु होत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मंगळवारी रात्री मोदींनी भाजप खासदारांना डिनरला निमंत्रीत केले होते. त्यात त्यांनी आक्रमक प्रचार करण्याचा सल्ला दिला आहे. हे अभियान 300 शहरांमध्ये 1000 चहा स्टॉलवर सुरु होणार आहे. येथे मोदी नागरिकांशी लाइव्ह संवाद साधणार आहेत. त्यासाठी गुजरातच्या 22 शहरांमध्ये 69 चहा स्टॉल तयार करण्यात आले आहेत. मात्र, यातील एकही चहा स्टॉल हे दंगल प्रभावीत मुस्लिम बहुल भागात नाही.
नरौडा पटिया आणि नरौडा गाव हा गुजरातमधील सर्वाधिक दंगल प्रभावीत भाग राहिला आहे. येथून जवळच निकोल-चिलाडा मार्ग आहे. या मार्गावरील 80 चहा स्टॉलला 'नमो टी स्टॉल' नाव देण्यात आले आहे. यातील एक स्टॉल हे मुस्लिम व्यक्तीचे आहे. मात्र, यातील एकही स्टॉलवर चाय पे चर्चाचे आयोजन करण्यात आलेले नाही. मेघानीनगर येथे गुलबर्ग सोसायटी आहे. त्याच्या आसपास मोठ्या संख्येने मुस्लिम राहातात. येथील जुहापूरा भागातही 'चाय पे चर्चा'चे आयोजन केले गेलेल नाही. वडोदरा मध्ये सहा स्टॉल लावण्यात आलेले आहेत. हे सर्व नव्याने विकसीत झालेल्या भागात आहेत. साबरमती एक्स्प्रेसला जेथे आगीच्या भक्ष्यस्थानी देण्यात आले होते आणि त्यानंतर 2002 ची दंगल भडकली, त्या गोधरमध्ये एक स्टॉल लावण्यात आले आहे. ते ही हिंदू बहुसंख्येने असलेल्या भागात.

सिटीझन्स फॉर अकांउटेबल गव्हर्नेन्स या एनजीओने 'चाय पे चर्चा' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी चहाच्या स्टॉलवर एक मोठा स्क्रिन असलेला टीव्ही लावण्यात येणार आहे. त्यावर चहाचा स्वाद घेत मोदी अवतरणार आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. चहावाल्यांना एकाच वेळी किमान 250 जणांना चहा पाजण्याची सोय करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, मोदींचा खासदारांना डिनर पार्टीतील सल्ला...