आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस स्वतःचे अस्तित्व वाचवण्याच्या प्रयत्नात : नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी दुसर्‍या आणि शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित न केल्याच्या मुद्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसला त्यांचा विनाश स्पष्ट दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणती आई आपल्या मुलाचा बळी देऊ शकते. काँग्रेस स्वतःचे अस्तित्व वाचवण्याचे प्रयत्न करत आहे.

मोदी देशाला अपील करत म्हणाले की- तुम्ही 60 वर्ष शासकाला दिले, आता फक्त ६० महिने एका सेवकाला देऊन पाहा. 17 जानेवारीला झालेल्या काँग्रेस अधिवेशनावर मोदींनी सांगितले की, काँग्रेस कार्यकर्ते त्या आधिवेशानमध्ये पीएम कँडिडेट घेण्यासाठी आले होते, परंतु गॅस सिलिंडर घेऊन गेले. त्यांनी आपल्या भाषणात चहावाल्यांचा उल्लेख करत सांगितले की, आज देशात प्रत्येक चहावाला छाती काढून फिरत आहे. मोदी म्हणाले राहुल गांधी 'नामदार' आहेत आणि मी 'कामदार' आहे. पुढे ते म्हणाले की रेल्वेच्या डब्यामध्ये चहा विकणाऱ्या मागासलेल्या जातीच्या व्यक्ती विरोधात ते निवडूक कशी काय लढतील? त्यांच्यासाठी हा अपमान असेल, कारण त्यांचे विचार प्रतिगामी आहेत.

मोदींनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार केला, ज्यामध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेस एक विचार आहे. यावर मोदी म्हणाले, कॉंग्रेसचा विचार काय आहे, हे काही माहित नाही, परंतु संपूर्ण काँग्रेस सध्या विचारात पडली आहे.

तत्पूर्वी सुषमा स्वराज आपल्या भाषणात काय म्हणाल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...