आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजी म्हणाले होते काँग्रेस विसर्जित करा, त्यांची इच्छा आपण पूर्ण करू - राजनाथ सिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणूकीची सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय बैठकीनंतर, आता भारतीय जनता पक्षाची दिल्लीतील रामलिला मैदानावर शनिवार व रविवार अशी दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी युपीए सरकारला लक्ष्य करताना, आता आपल्याला देशात परिवर्तन आणायचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती. त्यांची इच्छा आता आपण पूर्ण करु.'
भाजपच्या कार्यकाळात देशात आर्थिक स्थैर्य होते, महागाई नियंत्रणात होती, असा दावाही त्यांनी केला आहे. या बैठकीला भाजपशासीत राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. भाजपचे काही उत्साही कार्यकर्ते 'मोदी फॉर पीएम' लिहिलेल्या टोप्या घालून आले आहेत.

देशाला विकास हवा असेल तर भाजप विजयी होणे गरजेचे असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत चार राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आली आहे तर, दिल्लीत प्रथम क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमनसिंह, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि दिल्लीत ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेले ते डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेत्यांचा यशस्वी कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे.
भाजपच्या बैठकीआधी शुक्रवारी काँग्रेसची दिल्लीतील तालकटोरा येथे बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रचारप्रमुख राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदो यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. विरोधीपक्ष जातिय हिंसाचार आणि कट्टरवादाच्या आधारावर देशाचे तुकडे करत असल्याचा आरोप केला होता. यावर भाजपने 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या आरोपात नरेंद्र मोदी यांना कोर्टाने 'क्लिन चिट' देण्याचा मुद्या बचावासाठी वापरण्याची तयारी चालवली आहे.
नरेंद्र मोदींचा गुजरात दंगलींच्या आरोपापासून बचाव करण्यासाठी शुक्रावारी भाजपने एक राजकीय प्रस्ताव तयार केला आहे. यात कोर्टाने त्यांना गुजरात दंगलीच्या आरोपातून कसे मुक्त केले आहे, याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज मांडणार आहेत. यासह त्या राजकीय प्रस्ताव मांडतील आणि राज्यसभेतील विरोधीपक्षनेते अरुण जेटली आर्थिक प्रस्ताव मांडणार आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, युपीए सरकार देशात 'एनपीए' बनली आहे