आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिशंकर अय्यर यांनी गोव्यात दारुची ठेकेदारी आणि बार उघडावे, मोदींवरील टीकेला भाजपचे उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची टीका भाजपला चांगलीच झोंबली आहे. रामलिला मैदनात सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे गोव्याचे उपाध्यक्ष विलफ्रेड मॅस्किटा यांनी मणिशंकर अय्यर यांना गोव्यात दारुची ठेकेदारी आणि बार सुरु करण्याचे सुचविले आहे. ते म्हणाले, 'अय्यर यांना गोव्यात दारुचे कंत्राट आणि बार उघडण्यासाठी मदत हवी असेल तर ती करण्यास मी तयार आहे.'
त्याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मणिशंकर यांच्यावर टिप्पणी केली. ते म्हणाले, '2014 च्या निवडणूकीनंतर चहा कोण विकणार हे स्पष्ट होणार आहे.'
मणिशंकर अय्यर यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना म्हटले होते, की 21व्या शतकात मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यांची इच्छा असले तर एआयसीसीच्या बैठकीत त्यांना चहा वाटण्याची संधी देता येईल.