आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp National Executive Meet Underway In Bengaluru Today Last Day

भाजप बैठक : पक्षाध्यक्ष शहांच्या विनंतीनंतरही अडवाणींचा भाषणास नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु/नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भाषण केलेच नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या विनंतीनंतरही अडवाणी यांनी भाषणास नकार दिला. अडवाणींना पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला केले असल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांची नाराजी भाषणातून व्यक्त झाली आणि त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणावर जाहीर वक्तव्य केले तर पक्ष धुरीणांवर नामुष्कीची वेळ येईल, असे दोन दिवसांपासून बोलले जात होते.
पक्ष स्थापनेपासून फक्त दुसरी वेळ, अडवाणींनी नाही केले भाषण
भाजपची स्थापना झाल्यापासून ही फक्त दुसरी वेळ आहे, जेव्हा अडवाणी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलले नाही. याआधी 2013 मध्ये गोवा येथे झालेल्या बैठकीकडे अडवाणींनी पाठ फिरवली होती. तेव्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले जाणार होते. त्यानंतर आता 2015 मध्ये ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी झाले मात्र बोलले नाही.
शुक्रवारी बंगळुरु मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणच्या बैठकीला सुरुवात झाली होती. तेव्हा पासून अडवाणी भाषण करणार की नाही यावर चर्चा सुरु होती. पहिल्या कार्यक्रम पत्रिकेत मार्गदर्शकांच्या यादीत अडवाणींचे नाव होते, मात्र गुरुवारी अचानक दुसरी कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आला आणि त्यातून अडवाणींचे नाव गायब झाले होते.
सामाजिक कार्य पक्षाचा नवा अजेंडा
कार्यकारिणीच्या पहिल्या दिवशी पक्षाध्यक्ष शहा यांच्या भाषणात चार महत्त्वाचे मुद्दे होते. त्यावर पक्ष आगामी काळात काम करणार आहे. शहा म्हणाले, की 23 लाख नवे लोक पक्ष सदस्य झाले आहेत. स्वच्छ भारत अभियानातून अनेक लोकांसोबत पक्षाने थेट संपर्क साधला आहे. 'बेडी बचाओ - बेटी पढाओ' आणि गंगा स्वच्छता या मुद्यांवर आगामी काळात काम केले जाणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये, पाहा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील अडवाणी