नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शहा म्हणाले, भाजप घराणेशाहीचे राजकारण करत नाही. पुढील 5 वर्षे पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करेल. शहा यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत काय मार्गदर्शन केले याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना दिली. भाजपची 2019 च्या लोकसभा निवडणुकीची ही तयारी मानली जात आहे. भाजपने 2019 साठी मिशन 360 तयार केले आहे.
काय म्हणाले शहा
पीयूष गोयल म्हणाले, 'शहा म्हणाले, मोदींनी नव्या भारताचे जे व्हिजन सांगितले आहे. नव्या भारताचे स्वप्न हे 125 कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करणे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा निश्चय राहील. यासाठी संपूर्ण पक्ष पुढील 5 वर्षे काम करेल. पक्षाचा विस्तार आणि जनतेच्या हिताचे काम करणे हेच आमचे यापुढे ध्येय राहाणार आहे.'
कार्यकारिणी बैठकीसंदर्भातील माहिती देताना अरुण जेटली म्हणाले, पंतप्रधान बैठकीला उपस्थित झाले आहेत. ते म्हणाले, '13 मुख्यमंत्री, 6 उपमुख्यमंत्री, 7 केंद्रीय मंत्री, 232 राज्यमंत्री, 1515 आमदार, 334 खासदारांची कार्यसमिती तयार करण्यात आली आहे.'
- जेटली म्हणाले, भाजपने देशाला विश्वास दिला आहे. पक्षाने निवडणूक लढणे आणि जिंकणे यासोबत विश्वास आणि सत्तेला साधन मानवे.