आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP National President Amit Shah, Latest News In Divya Marathi

विधानसभेसाठी भाजप घेणार कष्‍ट, अमित शहांचे आता लक्ष्‍य ‘मिशन महाराष्‍ट्र ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपच्या महाराष्‍ट्रतील कोअर टीमने आज भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात असलेल्या अनुकुल वातावरणाची माहिती दिली. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेश प्रमाणेच महाराष्‍ट्रतील विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व शहा यांनी करावे अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र, तब्बल तीन ताच चाललेल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा केली नसल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 18 जणांनी या बैठकीत सहभाग घेतला. शिवसेनेकडून महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे अशी प्रतिक्रिया दिल्या जात असल्याची चर्चाही यावेळी करण्यात आली. प्रत्येक नेत्यांनी विभागवार आढावा सादर केला. शिवसेनेचे अनावश्यक लाड पूरवू नयेत याबाबतही काही नेत्यांनी आपले मत मांडले.
महाराष्‍ट्रातील विधानसभा निवडणुकीचे नियोजन करताना केंद्रीय मंत्र्यांना मतदार संघांमध्ये पाठविले जाणार आहे. केंद्रातील भाजपचा प्रत्येक मंत्री महाराष्‍ट्राला एक दिवस देईल असा निर्णय अमित शहा यांनी घेतला आहे. येत्या 25 जुलैपर्यंत बुथ रचना करण्याच्या सूचना शहा यांनी राज्यातील कोअर कमिटीच्या नेत्यांना दिल्या असून अमित शहांचे आता टार्गेट मिशन महाराष्‍ट्र राहणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. राज्यात 19 मतदार संघात भाजपने कधीच जागा जिंकल्या नाहीत त्या मतदार संघावर विशेष लक्ष केंद्री करण्याच्या सूचना अमित शहा यांनी दिल्यात.
विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीसंदर्भात पक्षश्रेष्ठींसोबत ही पहिली बैठक होती. यानंतर महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा करू, परंतु त्याआधी भाजपची नेमकी भूमिका ठरवू. शिवसेच्या अन्य नेत्यांकडून येणा-या प्रतिक्रियेला आम्ही गंभीरतेने घेत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अमित शहा 18 ला सरसंघचालकांना भेटणार! भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दि. 18 जुलै रोजी नागपूर येथे जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दि. 19 आणि 20 जुलै रोजी महाराष्‍ट्रातील भाजप नेत्यांची आरएसएसच्या समन्वय समितीची बैठक होत आहे. या बैठकीत मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा पालवे, महाराष्‍ट्र प्रांतचे संघटक व महामंत्री उपस्थित राहणार आहे.