आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने \'आप\'ला तोडण्यासाठी आमदाराला दिली होती 20 कोटी आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे कस्तूरबा नगरचे आमदार मदनलाल यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. मदनलाल यांनी सांगितले, की त्यांना आप सोडण्यासाठी कोटी रुपायांची ऑफर देण्यात आली होती. मदनलाल म्हणाले, 7 डिसेंबरच्या रात्री त्यांना एक आयएसडी कॉल आला. फोनवरून बोलणा-या व्यक्तीने स्वतःला नरेंद्र मोदी यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले. त्यासोबतच त्या व्यक्तीने अरुण जेटली यांच्याशी बोलण्यासही सांगितले. दुसरीकडे आपचे नेते संजयसिंग यांनी अंबानी आणि अदानी उद्योगसमुहाच्या इशा-यावर 'आप'विरोधात राजकीय षडयंत्र आखले जात असल्याचा आरोप भाजपवर केला आहे.
मदनलाल यांना 'आप'चे नऊ आमदार फोडण्यासाठी सांगण्यात आले होते. त्याबदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर आणि पैशांचे अमिष दाखविण्यात आले होते. यासाठी त्यांना 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. आज सकाळी 'आप'च्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला आहे. नरेंद्र मोदी, अरुण जेटली आणि हर्षवर्धन दिल्लीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप 'आप'चे नेते संजयसिंह यांनी केला आहे.
खिडकी एक्सटेंशन प्रकjणी स्पष्टीकरण देताना संजयसिंह म्हणाले, काँग्रेस आणि भाजप दोघेही मिळून 'आप'च्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले, 'आप' मंगळवारपासून भाजप विरोधात पोल-खोल अभियान सुरु करणार आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित 'आप'चे नेते अशुतोष म्हणाले, मीडियामधील मोदी समर्थक 'आप'ला लक्ष्य करीत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, मदनलाल...