आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा हा विजय ‘न्यू इंडिया’चा पाया, पक्ष मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झालेला विजय आणि इतर राज्यांत भाजपला जनतेने दिलेला प्रतिसाद म्हणजे भारतातील नवयुवकांच्या स्वप्नातील ‘न्यू इंडिया’चा नवा पाया असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

भाजप मुख्यालयात आयोजित सत्कार समारंभात मोदी म्हणाले, लोकशाही केवळ निवडणुका व सरकार स्थापन करण्यापुरती मर्यादित नाही, तर हे खऱ्या अर्थाने लोकशिक्षणाचे माध्यम अाहे. कोण जिंकले, कोण हरले हे आज महत्त्वाचे नाही. भाजपला जनतेने दिलेला हा पवित्र आदेश आहे. या आदेशाचे पालन करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करा, असे आवाहन मोदींनी केले. लोक मला म्हणतात, तुम्ही एवढे काम कसे करता? मात्र, असा प्रश्न विचारणे हेच मी माझे भाग्य समजतो,असे मोदींनी सांगितले.

तीन गोष्टी सांगितल्या...
मोदी म्हणाले, मी यापूर्वीही सतत ३ गोष्टी ठासून सांगितल्या आहेत. तेच आजही सांगतोय...
- आम्ही सत्तेत नवे आहोत, काही चूक होऊ शकते. मात्र, स्वार्थ आणि चुकीचा उद्देश ठेवून आम्ही कधीही काम करणार नाही. 
- जनतेच्या हितासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. 
- जे काही करू, कायम प्रामाणिकपणे करू.

सरकार सर्वांचेच
जनतेने भाजपला साथ दिली. तरी एकदा सरकार स्थापन झाले की ते एका विचारांच्या लोकांसाठी नसते. ते सर्वांचेच असते. ज्यांनी मते दिली त्यांचे, ज्यांनी दिली नाहीत त्यांचेही. सरकारला भेदभाव करण्याचा हक्कच नाही. जे सोबत होते किंवा जे नव्हते त्या सर्वांचेच हे सरकार असेल, अशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

मोदी सर्वात लोकप्रिय पंतप्रधान
शहा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्कारापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मोदींच्या सन्मानार्थ भाषण केले. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील मोदी हेच सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे ते म्हणाले. २०१४ मध्ये देशात जे ऐतिहासिक परिवर्तन झाले त्याहीपेक्षा अधिक विश्वास या पाच राज्यांतील निवडणुकांच्या वेळी जनतेने त्यांच्यावर दाखवला असल्याचे शहा यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात तीन चतुर्थांश बहुमत आणि उत्तराखंडमधील यशाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
 
हा नवीन भारत आहे
मोदी पुढे म्हणाले की, "निवडणुकीचे हे निकाल ६५ टक्के तरुण वर्गाचा आणि महिलांचा नवीन भारत आहे, असा भारत जो काही मिळण्यापेक्षा काही नवीन करण्याची इच्छा निर्माण करणारा आहे. हा विचार नवीन भारताचा पाया आहे.
- निवडणूक जनतेचा एक पवित्र आदेश असतो. परमेश्वराने आम्हाला या आदेशाचे पालन करता यावे एवढी शक्ती द्यावी.
- झाडेही आपल्याला शिकवण देतात की, फळ लागल्यानंतर ते वाकतात. भाजपवर विजयाचे फळ लागले आहेत आणि यामुळे आपणही  आणखी वाकून आणि नम्र होऊन जनतेची सेवा करणे आवश्यक आहे.
- या विजयासाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्यांनी खूप तप केले आहे. त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला जनतेची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. या वर्षी पंडित दीनदयाळ यांची जन्मशती आहे. युपी त्यांची कर्मभूमी राहिली आहे. त्यांनी सांगितले होते की, गरिबांची ताकद ओळखा आणि देशाच्या निर्माणासाठी जेवढी जास्त त्यांना संधी मिळेल देश तेवढाच पुढे जाईल.
- मी निवडणुकीप्रमाणे चालणार व्यक्ती नाही. 2022 मध्ये स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होतील. आतापर्यंतच्या सर्व सरकारने देशासाठी काम केले आहे. त्यांचाही आम्ही आदर करतो. आमच्याकडे पाच वर्षांचा काळ आहे. सव्वाशे कोटी जनतेने प्रत्येक वर्षी एक नवीन संकल्प केला तर देश मागे राहणार नाही. या निवडणूक निकालांच्या माध्यमातून नवीन ताकद मिळाली आहे. देशबांधवांमध्ये विकासाचे आंदोलन पूर्ण करायचे आहे. प्रत्येक व्यक्तीला मुख्यप्रवाहाशी जोडायचे आहे.
 
 
कोणकोणते नेते उपस्थित?
- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान.
- खासदार मनोज तिवारी, व्यंकय्या नायडू, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद

युपीमध्ये 15 वर्षांनंतर पुन्हा सत्तेवर...
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी ले मेरेडियन हॉटेलपासून अशोक रोड स्थित भाजप मुख्यालयापर्यंत पाय जाणार आहेत.
- शनिवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. सर्वात जास्त चकित करणारे आकडे उत्तर प्रदेशमधील आहेत. तीन चतुर्थांश बहुमताने भाजपने 15 वर्षानंतर पुन्हा सत्ता काबीज केली आहे.
- भाजपला उत्तरप्रदेशमध्ये 325 जागा मिळाल्या आहेत. 37 वर्षांनंतर एखाद्या पक्षाला 300+ जागा मिळाल्या आहेत.
- उत्तराखंडमध्येही भाजपला बहुमत मिळाले आहे.

निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलेले ट्विट..
- पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मी उत्तर प्रदेशच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. भाजपचा हा ऐतिहासिक विजय विकास आणि सुशासनाचा विजय आहे."
- 'उत्तराखंडमधील विजय विशेष खास आहे. देवभूमीच्या लोकांचे आभार. मी तुम्हाला विश्वास देतो की, भाजप पूर्ण तत्परतेने आणि कर्मठतेने जनतेची सेवा करेल."
- पंतप्रधान मोदींनी पक्षाला नवीन शिखरावर घेऊन गेल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि स्टेट युनिटचे कौतुक केले.
बातम्या आणखी आहेत...