Home »National »Delhi» BJP Parliamentary Board Meeting Today To Decide Vice-Presidential Candidate VP

उपराष्ट्रपती निवडणूक: व्यंकय्या नायडूंच्या निवडीची 'ही' आहेत दोन कारणे, विजयही निश्चित

दिव्य मराठी नेटवर्क | Aug 05, 2017, 17:31 PM IST

नवी दिल्ली-भावी उपराष्ट्रपतींचेही नाव निश्चित झाले आहे. भाजपने सोमवारी एनडीएचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा केली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. नायडूंची लढत १८ विरोधी पक्षांचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्याशी होईल. ते मंगळवारी अर्ज दाखल करतील. मतदान आणि निकाल ५ ऑगस्टला जाहीर होईल. उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपत आहे. प्रथमच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही भाजपचे होतील.

दोन महिन्यांपूर्वी म्हणाले, मी ‘उषा’पती होऊनच सुखी...
मे मध्ये नायडू म्हणाले होते, ‘मला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतीही व्हायचे नाही... मी तर उषापती बनूनच आनंदी आहे.’ उषा त्यांच्या पत्नीचे नाव आहे.

नायडूंच्या निवडीची २ कारणे : दक्षिणेत विस्तार आणि राज्यसभेत फायदा

दक्षिणेकडील ३ राज्यांत निवडणुका
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपत चर्चा झालेली तिन्ही नावे द. भारतातील आहेत. यात नायडू आंध्र प्रदेशचे आहेत. ते उपराष्ट्रपती झाल्यास पक्षाला कर्नाटक, तेलंगण, आंध्र व तामिळनाडूत फायदा होईल. पुढील २ वर्षांत कर्नाटक, आंध्र व तेलंगणमध्ये निवडणुका आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचाही मार्ग सुकर होईल.

राज्यसभेत सरकारला मदत होणार
उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असतात. चार वेळचे राज्यसभा खासदार नायडूंना या सभागृहाचा चांगला अनुभव आहे. ते संसदीय कार्यमंत्रीही होते. राज्यसभेत अद्याप एनडीएला बहुमत नाही. यामुळे मर्जीतला सभापती असल्यास सरकारला राज्यसभेत अडकलेली विधेयके मंजूर करून घेण्यात मदत मिळेल.

परिणाम: ४ मंत्रालये रिक्त, मंत्रिमंडळाचा विस्तार आवश्यक
नायडू उपराष्ट्रपती झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आवश्यक होईल. नायडूंकडे नगरविकास खाते आहे. पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यानंतर जेटलींकडे संरक्षण मंत्रालय आहे. अनिल दवे यांच्या निधनानंतर हर्षवर्धन यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय आहे.

मतदार:लोकसभा खासदार+राज्यसभा खासदार= ७७६
विजयाचे गणित..
३८३ मते हवी विजय मिळवण्यास
४१२ खासदार आहेत एनडीएकडे
अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, टीआरएस व इतरांच्या पाठिंब्याने ५०० पेक्षा जास्त मतांची अपेक्षा.
अमित शहांनी दिला अल्प परिचय...
- "एनडीएच्या सर्वच सहकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर व्यंकैया नायडू यांना उपराष्ट्रपति पदाचे उमेदवार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते 1970 पासून सार्वजनिक जीवनात आले. जयप्रकाश यांच्या संघर्षात ते दक्षिण भारतातील महत्वाचे नेते होते. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि दोन वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पदी कार्यरत होते."
- "संसदीय कामकाजाचा त्यांच्याकडे 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते अगदी लहानपणापासून पक्षाशी जोडलेले आहेत. आमच्या सर्वच पक्षांनी त्यांच्या नावाला समर्थन दिले. ते मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत."
- "विरोधी पक्षांनी आपल्या उमेदवाराची यापू्र्वीच घोषणा केली आहे. त्यामुळे, सर्वांच्या एकमताची अपेक्षा केली जाऊ शकणार नाही. मंगळवारी सकाळी 11 वाजता ते आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. या पदाच्या उमेदवारीसाठी अनेकांची नावे होती. त्यापैकी अखेर नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे."
विरोधी पक्षांकडून गांधी यांना उमेदवारी
- काँग्रेस आणि एकूणच 18 विरोधी पक्षांनी 71 वर्षीय गोपाळ कृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले आहे. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1946 रोजी झाला. ते महात्मा गांधी यांचे नातू आहेत. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी होते. त्या फ्रीडम फायटर आणि कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सी. राजगोपालाचारी यांच्या कन्या होत्या.
- गोपाळकृष्ण 1968 मध्ये आयएएस झाले. 2004 ते 2009 पर्यंत त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल पद भूषविले. एकेकाळी 294 मेंबर्सच्या सभागृहात ते एकटे डावे आमदार होते. याचवेळी बंगालच्या सिंगूर आणि नंदीग्राम येथे हिंसक आंदोलने झाली.
- 2008 च्या सिंगूर हिंसाचाराच्या वेळी गोपाळकृष्ण गांधी यांनीच बुद्धदेव भट्टाचार्य आणि ममता बॅनर्जी यांना चर्चेसाठी तयार केले होते. त्यावेळी डाव्यांची ताकद कमी आणि ममता यांची ताकद वाढली होती.
- गांधी सेंट स्टीफन्स कॉलेजचे विद्यार्थी होते. आयएएस झाल्यानंतर 80 च्या दशकात ते तामिळनाडूत तैनात होते. 1985 ते 1987 पर्यंत ते उप-राष्ट्रपतींचे सचिव होते. यानंतरची 5 वर्षे ते राष्ट्रपतींचे संयुक्त सचिव होते.
- 1992 ते 2003 मध्ये त्यांनी अनेक मुत्सद्दी पदे भूषविली. 1996 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेत भारताचे उच्चायुक्त होते. 1997 ते 2000 पर्यंत राष्ट्रपतींचे सचिव, 2000 मध्ये श्रीलंकेचे हायकमिश्नर आणि 2002 नंतर नॉर्वे आणि आयरलँडचे राजदूत होते.
- गोपाळकृष्ण गांधी यांच्या पत्नीचे नाव तारा असून त्यांना 2 मुली आहेत.

Next Article

Recommended