आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीच्या निर्णयाला \'सर्जिकल स्ट्राईक\' म्हणू नका; भाजपच्या बैठकीत मोदी झाले भावूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काळा पैशांना आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500- 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. पण, त्यांच्यावर विरोधांनी टीकेची तोफ दागली आहे. मोदी सरकारच्या निर्णयाला 'सर्जिकल स्ट्राईक', असे संबोधले जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत बोलावण्यात आलेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी भावूक झाले. नोटाबंदीला सर्जिकल स्ट्राईक म्हणू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पंतप्रधानांनी सांगितले की,
- 'सर्जिकल स्ट्राईक' केवळ लष्करातील जवानच करू शकतात. नोटाबंदीला 'सर्जिकल स्ट्राईक' म्हणता येणार नाही.
- नोटाबंदीचा निर्णय हा जनतेच्या हितासाठी घेण्यात आला आहे. या निर्णयाचे लाभ थेट जनतेलाच मिळणार आहे.
- ऐतिहासिक निर्णयामुळे देशातील काळा पैसा बाहेर निघण्यास मदत होणार आहे. मोदी सरकारने 'नरेंद्र मोदी अॅप'वर या निर्णयावर देशातील आम जनतेचे मते मागितले आहेत.
- मोदी म्हणाले की, सरकारच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचारासोबतच मनी लॉंड्रिंगवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
- सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाबाबत विरोधक देशातील जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवत आहेत. भाजपचे खासदार लवकरच जनतेसोबत संवाद साधणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे सांगणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाले अर्थमंत्री...? देशातील गरिबी दूर करण्यासाठी घेेतला नोटाबंंदीचा निर्णय...
बातम्या आणखी आहेत...