आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Parliamentary Party Meeting, PM Thanks To Mulayamsingh Yadav

विरोधकांच्या प्रचंड गदारोळात जीएसटी विधेयक सादर, राज्यसभा तहकूब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रचंड गदारोळात सरकारने मंगळवारी राज्यसभेत जीएसटी विधेयक सादर केले. विरोधकांना न जुमानता अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेत जीएसटी विधेयक मांडले. मात्र, विरोधकांचा गोंधळ वाढतच गेल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

डाव्या पक्षांने तसेच कॉंग्रेसच्या खासदारांनी जीएसटी विधेयकाला कडाडून विरोध केला. वादाच्या भोवर्‍यात सापडलेले भाजपचे तिन्ही नेते राजीनामा देत नाही तोपर्यंत गदारोळ सुरुच ठेवा असे आदेश कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या खासदारांना दिले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी एरव्ही प्रत्येक मुद्द्यावर बोलतात. परंतु, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर का बोलत नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मोदींची मौन का? असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ता आनंद शर्मा यांनी उपस्थित केला आहे. संसदेतील गदारोळाला नरेंद्र मोदींचा अहंकारी स्वभावच जबाबदार असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

जीएसटी विधेयकाला कॉंग्रेसचा विरोध नाही, विधेयक ज्या पद्धतीने सादर केले जात आहे, त्याला विरोध असल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ता आनंद शर्मा यांनी स्पष्‍ट केले आहे. दरम्यान, जीएसटी विधेयक यूपीए सरकारच्या काळापासून प्रलंबित आहे.

मंगळवारी देखील गोंधळानेच सुरुवात
संसदेच्या कामकाजाला मंगळवारी गोंधळात सुरुवात झाली. संसदेचे कामकाज सुरु होण्याआधी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायम सिंह यांचे आभार मानले. तसेच काही लोकांचा देशाचा विकास होऊ द्यायचा नाही. म्हणून ते सरकारच्या कामात विनाकारण व्यत्यय आणत आहेत, असे भाजपचे नेते राजीव प्रताप रूडी यांनी पत्रकारांना सांगितले.

काळ्या पट्ट्‍या बांधून सभागृहात पोहोचले कॉंग्रेस खासदार
कॉंग्रेसचे खासदार मंगळवारी देखील काळ्या पट्ट्या बांधूनच लोकसभेत पोहोचले. लोकसभेचा कामकाज सुरु होताच कॉंग्रेस खासदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. जीएसटी विधेयक रोखणे, हा कॉग्रेसचा मुख्य उद्देश आहे. कॉंग्रेसचे खासदार विनाकारण गोंधळ घालत असल्याचे संसदीय कार्यमंत्री व्यंकेय्या नायडू यांनी म्हटले आहे. लोकशाहीच्या म‍ंदिरात गोंधळ घालणे योग्य नाही.