आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP President Amit Shah Says Arvind Kejriwal Has Power To Attract Media News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरीवालांमध्ये मीडियाचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता जास्त; अमित शहांनी केले कबूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये मीडियाला आकर्षित करण्याची जास्त क्षमता असल्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कबूल केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'आप'वर एकापाठोपाठ एक हल्लाबोल करणार्‍या भाजपच्या अध्यक्षांनी असे म्हटल्याचे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अमित शहा एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

' भाजपकडून वारंवार केजरीवाल यांच्या टीका होत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढली आहे काय?' असा प्रश्न अमित शहा यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शहा म्हणाले की, केजरीवाल यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे हे जनतेच्या लक्षात आणून देणे हे आमचे कर्तव्य आहे. भाजपने आठ महिन्यांत जी कामे केली. तीच सांगत भाजप सांगत आहे. मात्र, केजरीवाल यांच्या मीडियाचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता जास्त असल्याचेही शहा यांनी यावेळ‍ी सांगितले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच बहुमताने विजयी होईल, असा विश्वास देखील शहा यांनी वर्तवला आहे.
'केजरीवालांना देणग्या देणार्‍या कंपन्यांवर होईल कारवाई'
'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना चुकीच्या मार्गाने देणग्या देणार्‍या कंपन्यांवर कारवाई होणार असल्याची भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. कंपन्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, 'आप'ला बनावट कंपन्यांकहून 50-50 लाख रुपयांच्या देणग्या घेतल्याचा भांडाफोड एका एनजीओने केला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर अद्याप कोणताही आक्षेप घेतलेला नाही. परंतु दोन कोटी रुपयांची देणगी घेणार्‍या 'आप'वर शहा यांनी घणाघाती टीका केली आहे. भाजप अर्ध्यारात्री कोणतीही देणगी घेत नसल्याचा शहा यांनी 'आप'वर टीका केली आहे.
दरम्यान, देणगीची रक्कम 10 लाख रुपयांच्यावर असेल तर याबाबत उच्च समिती निर्णय घेत असल्याचे 'आप' नेते योगेंद्र यादव यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र, बनावट कंपन्यांकडून 'आप'ने दोन कोटी रुपयांची देगणी घेतली तेव्हा उच्च समितीने चौकशी का केली नाही, असा सवाल देखील अमित शहा यांनी उपस्थित केला आहे.
केजरीवाल आता लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. म्हणून ते अटक करून दाखवण्याचे पोकळ आवाहन करत असल्याचे शहा यांनी म्हटले आहे.