आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP President Rajnath Singh Woos Muslims With Offer Of Apology For Mistakes

मुस्लिमांच्या माफीवरून भाजपचे 24 तासांत घूमजाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई - मुस्लिमांची माफी मागण्याच्या मुद्दय़ावर भाजपने 24 तासांतच घूमजाव केले आहे. भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी भूतकाळातील कोणत्याही गोष्टीबद्दल माफी मागितली नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिले. दुसरीकडे, भाजपने मुस्लिमांची माफी मागण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जावडेकर म्हणाले, पक्षाध्यक्षांनी चुकांसाठी मुस्लिमांची माफी मागितली होती. यामध्ये ते स्पष्टपणे काहीही बोलले नव्हते. राजनाथसिंह यांनी मंगळवारी दिल्लीत मुस्लिम समाजांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना म्हटले होते की, आमची काही चूक झाली असल्यास आम्ही माफी मागण्यास तयार आहोत. राष्ट्र उभारणीसाठी भाजपला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी गोध्रा मुद्दय़ावरून (गुजरात दंगल) कोणी माफी मागावी, असे मला वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. साबरमती एक्स्प्रेस पेटवून दिल्यानंतरची ती प्रतिक्रिया होती. याचबरोबर बाबरी मशीद पाडल्याबद्दलही माफी मागण्याची गरज नसल्याचे राऊत म्हणाले.

माफी अपुरी : पीस पार्टी
राजनाथसिंह यांची माफी पुरेसी नाही, असे पीस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अय्युब यांनी सांगितले. निवडणुकीत मुस्लिमांचा पाठिंबा मिळावा यासाठी ही निवडणुकीपुरती दाखवलेली चतुराई आहे.