आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांना दिल्ली, लुधियानात धक्काबुक्की

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/लुधियाना - आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या तसेच नेत्यांच्या गैरवर्तणुकीच्या निषेधार्थ भाजप, अकाली दल आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली तसेच लुधियानात धक्काबुक्की केली.

केजरीवाल गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबच्या दौऱ्यावर रवाना झाले. केजरीवाल सकाळी वाजता रेल्वेस्थानकात येताच दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा कमलजीत सेहरावत यांच्या आणि पक्ष प्रवक्ते प्रवीण कपूर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तसेच केजरीवाल यांच्या दिशेने बांगड्या दाखवल्या. केजरीवाल शताब्दी एक्स्प्रेसने लुधियाना रेल्वे स्थानकात उतरताच तेथे शिरोमणी अकाली दलाच्या युवक शाखेच्या तसेच काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांना बांगड्या देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘केजरीवाल परत जा’ अशा घोषणा दिल्या.
बातम्या आणखी आहेत...