आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरींच्या \'हेरगिरी\'वर भाजप कार्यकर्ते संतप्त, पोलिसांकडून पाण्याचा मारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पार्टीचे (आप) सरकार हेरगिरी करत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने केली. निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी दिल्ली सरकारवर निशाणा साधताना म्हटले, की आप सरकार नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणत आहे. त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा अधिकार आप सरकारला कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, 'हेरगिरीची उपकरणे खरेदी करण्याचा अधिकार अरविंद केजरीवालांना कोणी दिला ? '
काय आहे प्रकरण
केजरीवाल सरकार भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हेरगिरीचा प्लॅन तयार करत आहे. त्याअंतर्गत लाच लूचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) हेरगिरी करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे दिली जात असल्याची माहिती शुक्रवारी समोर आली होती. दिल्ली सरकारच्या प्रस्तावानूसार एसीबीला कोणाचीही हेरगिरी करण्याचा अधिकार असणार आहे. त्यांच्या चौकशी दरम्यान ते नव्या आधुनिक उपकरणांचा उपयोग करतील. त्यासोबतच ट्रॅप लावण्यासाठीही या उपकरणांचा उपयोग होणार आहे. मात्र दिल्ली सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे.
केजरीवालांचा हा हेरगिरीचा प्लॅन त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. नियमानूसार राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकहिताच्या प्रकरणांशिवाय कोणाचीही हेरगिरी केली जाऊ शकत नाही. मात्र दिल्ली सरकार सर्वसामान्यांच्याही हेरगिरीला परवानगी देत असल्याचे वृत्ताने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी निदर्शने केली.
बातम्या आणखी आहेत...